Bihar Election : हार स्वीकारता आली पाहिजे, फडणवीसांचं पवारांना झोंबणारं उत्तर…

Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत एनडीएने शानदार कामगिरी करत 243 पैकी 202 जागांवर

  • Written By: Published:
Bihar Election

Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत एनडीएने शानदार कामगिरी करत 243 पैकी 202  जागांवर विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे महाआघाडीला फक्त 35 जागांवर विजय मिळाला आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिलांच्या खात्यात 10-10 हजार रुपये जमा केल्याने याचा परिणाम निवडणुकीवर झाला आणि त्यामुळेच एनडीएला विजय मिळाला अशी प्रतिक्रिया दिली होती. तर आता शरद पवारांना प्रत्युत्तर देत हार स्वीकारता आली पाहिजे अशी असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, निवडणुकीत जो जिंकतो तोच सिकंदर ठरतो. पराभवानंतर हार स्वीकारता यायला हवी, आपल्या चुका कबूल करता यायला हव्यात, तसेच आत्मपरीक्षणही करता आले पाहिजे परंतु आमच्या विरोधी पक्षाला हे मान्य नाही असा टोला देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लावला. तसेच खऱ्या अर्थाने, विविध प्रकारच्या योजना राबवण्याची सर्वांना मुभा होती. आम्ही ज्या योजना राबवल्या त्या लोकांना आवडल्या, म्हणूनच लोकांनी आम्हावर प्रेम दाखविले असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते शरद पवार?

बिहारच्या निवडणुकीचं (Bihar Election) मतदान झालं त्यानंतर मी काही लोकांशी बोललो. त्यांच्याकडून मला अशी माहिती मिळाली की बिहारच्या निवडणुकी मतदान महिलांनी हातामध्ये घेतलं होतं. एक अशी शंका होती, ज्या अर्थी महिलांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग घेतला याचा अर्थ महिलांना त्यांच्या खात्यात 10 हजार रुपये देण्याच्या योजनेचा हा परिणाम असावा असं माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले.

माध्यमांशी बोलताना शरद पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात देखील निवडणुकीच्या आधी अधिकृत पैसे वाटले म्हणजे प्रत्येक मताला पैसे देतात तसे नाही, तर सरकारच्यावतीने योजनेच्या माध्यमातून पैसे दिले म्हणजे लाडकी बहीण योजना. आता प्रश्न असा आहे की यापुढील निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांनी मतदानाच्या आधी अशा प्रकारे पैशांचं वाटप करुन निवडणुकीला सामोरं जाण्याची भूमिका घेतली तर निवडणुकीच्या प्रक्रियेवरील लोकांच्या विश्वासाला धक्का बसेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप करणं हे योग्य आहे का? याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगानेही गांभीर्याने याचा विचार केला पाहिजे. निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत असं देखील यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.

बिहारमध्ये 16 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त, अजित पवार म्हणाले, न सांगता उमेदवार दिले अन्…

follow us