शशी थरूर यांनी नाकारला ‘वीर सावरकर पुरस्कार’, नेमकं कारण काय?
Shashi Tharoor On Veer Savarkar Award : काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरुर केरळ विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाची साथ सोडणार
Shashi Tharoor On Veer Savarkar Award : काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरुर केरळ विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाची साथ सोडणार असून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर शशी थरुर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे.
तर दुसरीकडे आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी वीर सावरकर पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात शशी थरुर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पहिला वीर सावरकर आंतरराष्ट्रीय प्रभाव पुरस्कार 2025 10 डिसेंबर रोजी दिल्लीतील एनडीएमसी कन्व्हेन्शन हॉलमध्ये प्रदान केला जाणार होता. या पुरस्कारासाठी काँग्रेस नेते शशी थरूर यांचे नाव निश्चित करण्यात आले होते.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा हे देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते.मात्र आता थरूर यांनी पुरस्कार नाकारून सर्वांना धक्का दिला आहे.
शशी थरूर यांनी तिरुअनंतपुरम (Thiruvananthapuram) येथे पत्रकारांना सांगितले की त्यांना पुरस्काराबद्दल माहिती देण्यात आली नव्हती आणि त्यांनी तो स्वीकारलाही नाही. त्यांच्या संमतीशिवाय त्यांचे नाव जाहीर केल्याबद्दल त्यांनी आयोजकांना बेजबाबदार म्हटले. ऑपरेशन सिंदूरनंतर शशी थरुर कधीही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु होती.
ड्रोनने सर्व्हे अन् शेतातील 5 लाखांचा गांजा जप्त; भोकरदन पोलिसांची मोठी कारवाई
भारत सरकारने ऑपरेश सिंदूरनंतर शशी थरुर यांना भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जगातील अनेक देशात देखील पाठवले होते. तर नुकतंच रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी भारत दौरा केला. त्या भेटीदरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह संपूर्ण विरोधी पक्ष वगळता फक्त काँग्रेस नेते शशी थरूर यांना आमंत्रित करण्यात आले होते.
