माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आरक्षणाच्या विरोधात; काँग्रेस नेते शशी थरुर नक्की काय म्हणाले?

माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आरक्षणाच्या विरोधात; काँग्रेस नेते शशी थरुर नक्की काय म्हणाले?

Shashi Tharoor  ON Neharu: काँग्रेसचे नेते शशी थरूर यांचे Our Living Constitution या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आले. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने शशी थरूर आणि माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्यात संवाद झाला. दरम्यान, याच कार्यक्रमावेळी थरूर यांनी मोठं विधान केलं आहे. आरक्षणावर बोलताना (Tharoor) भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे आरक्षणाच्या विरोधात होते, असं विधान केलं आहे.

यावेळी बोलताना त्यांनी तरुणी पिढी आणि माध्यमांवर भाष्य केलं. सरकारने माध्यमांत हस्तक्षेप करू नये. सरकारकडे राजकीय अजेंडा असतो, असं मत थरूर यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर त्यांनी भारतातील आरक्षण व्यवस्था आणि पंडित नेहरू यांचा दृष्टकोन यावरही भाष्य केलं. पंडित नेहरू हे आरक्षणाच्या विरोधात होते. पण त्यांनी UCC अर्थात समान नागरी कायदा आवश्यक आहे, असं सांगितेल होते, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

Video : तेव्हा भाजप नेते अरुण जेटलींनी मला धमकावलं; राहुल गांधींचा आरोप, भाजपकडून प्रतिउत्तर

समान नागरी कायद्यावर बोलताना त्यांनी उत्तराखंडच्या UCC कायद्यातील काही कलमे हास्यास्पद आहेत. ‘लिव्ह-इन’ बाबतचे कलम मला मान्य नाही, असंही थरूर यांनी स्पष्टपणं सांगितलं आहे. बहुतेक देशांकडे समान नागरी कायदे आहेत, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. आजही हजारो खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. यावर बोलताना कोर्टांमध्ये प्रकरणांचा ढीग वाढतोय, ही परिस्थिती अविश्वसनीय आहे. एआय वापरून काही मार्ग काढता येईल का? ते पाहता येईल, असं मत थरूर यांनी व्यक्त केलं.

संविधान हे समान नागरी संहितेची भावना व्यक्त करते. माझ अस म्हणणं आहे, की किमान 75 वर्षांच्या संविधानानंतर संविधानाची महत्त्वाकांक्षा आणि ध्येय साध्य करणं आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, असं मत चंद्रचूड यांनी व्यक्त केलं. परंतु, समान नागरी कायदा लागू करताना आपण आपल्या समाजाला विश्वासात घेतलं पाहिजे हे खरोखरच राष्ट्र म्हणून समाजाच्या भविष्याच्या हिताचे आहे, असं सांगितले पाहिजे हेही चंद्रचूड यांनी आवर्जून सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube