Video : शशी थरूर भाजपात जाणार?; मोदींच्या सोबत हस्तांदोलन अन् चेहऱ्यावरील हास्यानं चर्चांना उधाण

Video : शशी थरूर भाजपात जाणार?; मोदींच्या सोबत हस्तांदोलन अन् चेहऱ्यावरील हास्यानं चर्चांना उधाण

Will Shashi Tharoor join BJP : गेल्या काही दिवसांपासून खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) काँग्रेस (Congress) सोडणार असल्याची सुरू आहे. त्यातच आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत (Narendra Modi) एका व्यासपीठावर दिसून आले. दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना मोदींनी केलेल्या एका विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगलीये. आजच्या कार्यक्रमामुळं अनेकांची झोप उडणार आहे, असं विधान मोदींनी केलं. त्यामुळं थरूर भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना ऊत आलाय.

पहलगाम हल्ल्यानंतर मुस्लिम राष्ट्रांकडून पाकिस्तानला पाठिंबा; भारताविरोधात 57 देश एकवटले 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (२ मे) केरळमधील तिरुअनंतपुरम येथील विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचे उद्घाटन केलं. या कार्यक्रमात खासदार शशी थरूर आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन हे देखील उपस्थित होते. त्यामुळे, या कार्यक्रमाकडे अनेकांचे लक्ष लागलं होतं. दरम्यान, यावेळी आपल्या भाषणात मोदींनी केवळ शशी थरूर यांचा उल्लेखच केला नाही तर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या १५ लोकांपैकी फक्त शशी थरूर यांच्याशी हस्तांदोलन केले. पंतप्रधान मोदी व्यासपीठावर पोहोचले तेव्हा सर्वांनी हात जोडून त्यांचे स्वागत केले. थरूर यांनीही तेच केलं. पण पंतप्रधान मोदींनी थरूर यांच्यापुढं हात करत त्यांना हस्तांदोलन केलं.

करिश्मा अन् करीनानंतर कातील लूकसह कपूर घराण्याची आणखी एक मुलगी करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री 

दरम्यान, आपल्या बोलताना पंतप्रधान मोदींनी सूचक विधान केलं. ते म्हणाले, मी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना सांगू इच्छितो की तुम्ही इंडिया ब्लॉकचे एक मजबूत स्तंभ आहात. शशी थरूरही इथे बसले आहेत. आजचा कार्यक्रमामुळं अनेकांची झोप उडणार आहे. ही गोष्ट जिथे पोहचायची, तिथं पोहोचलीही असेल, असं म्हणत मोदींनी एक प्रकारे इंडिया आघाडीला इशारा दिला.

दरम्यान, गुरुवारी रात्री तिरुअनंतपुरम विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री विजयन, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि शरूर देखील उपस्थित होते. त्यानंतर आज थरूर या कार्यक्रमालाही हजेरी लावल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत.

पंतप्रधानांनी उद्घाटन केलेले बंदर थरूर यांच्या तिरुअनंतपुरम मतदारसंघात आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल अंतर्गत सुमारे ८,८६७ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प पूर्ण झाला. हे बंदर भारताच्या व्यापार आणि जहाज वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube