स्वातंत्र्याच्या चळवळीचा साक्षीदार ‘इंडिया क्लब’ होणार बंद, ‘शशी थरूर कुटुंबाचे आहे खास नाते’

स्वातंत्र्याच्या चळवळीचा साक्षीदार ‘इंडिया क्लब’ होणार बंद, ‘शशी थरूर कुटुंबाचे आहे खास नाते’

India Club : लंडनचा ऐतिहासिक इंडिया क्लब 17 सप्टेंबरपासून कायमचा बंद होणार आहे. हा क्लब यूकेमधील स्वातंत्र्याच्या चळवळीचा भारतीयांचा अड्डा होता. येथील रेस्टॉरंटमध्ये भारतीय खाद्यपदार्थ मिळत होते. ब्रिटनमधील स्वतंत्र्य चळवळीशी संबंधित लोकांसाठी एक लाउंजिंग क्लब होता. क्लबच्या सुवर्णकाळात अनेक ब्रिटिश अधिकारी तसेच भारतीय राजकारणी येथे येत होते.

गेल्या काही वर्षांत क्लबच्या आजूबाजूला कमर्शियल प्रॉपर्टी वाढली होती. तसेच ब्रिटनमधील भाडेवाढीमुळे क्लब काही काळ बंदही करण्यात आला होता. जाणून घेऊया इंडिया क्लबची कहाणी…

इंडिया क्लबची सुरुवात कशी झाली?
हा क्लब लंडनमधील स्ट्रँड कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये होता. याची सुरुवात 1951 मध्ये इंडिया लीगने केली होती. भारतीय स्वातंत्र्याला पाठिंबा देणारी ही एक ब्रिटिश संघटना होती. त्यात ब्रिटिश समाजातील उच्चभ्रू वर्गातील सदस्यांचा समावेश होता. स्वातंत्र्यानंतर या क्लबने भारत-ब्रिटिश मैत्री वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पीटीआयच्या अहवालानुसार, इंडिया क्लब कमी वेळात आशियाई समुदायाची सेवा करणाऱ्या लीगसारख्या गटांचा आधार बनला.

World cup 2023 मध्ये अश्विनची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री, रोहित शर्माने दिले संकेत

क्लब लंडन वेबसाइटनुसार, ‘भारतीय पत्रकार संघ, भारतीय कामगार संघटना आणि ब्रिटनमधील भारतीय समाजवादी गट यांनी त्यांच्या कार्यक्रमासाठी 143 क्लबचा वापर केला. ही इमारत इंडिया लीगच्या नवीन शाखांसाठी एक आधार होती. इथून विनामूल्य कायदेशीर सल्ला आणि संशोधन आणि अभ्यास युनिट चालवते जात होते.’

वेबसाइटमध्ये लिहिले की, ‘ज्या काळात ब्रिटनमध्ये आशियाई लोकांसाठी दैनंदिन जीवन जगणे कठीण होते, तेव्हा लंडन क्लब उपखंडातील प्रवासी समुदायांसाठी एक महत्त्वाचे केंद्र बनला होता.’ अलीकडे डोसा आणि करी सर्व्ह करण्याव्यतिरिक्त लंडन क्लबने पॅनेल चर्चा आणि चित्रपट स्क्रीनिंग आयोजित करण्यास सुरुवात केली होती.

Maharashtra Politics : सत्तासंघर्षाची ‘सुप्रीम’ सुनावणी; शिवसेना पक्ष अन् 16 अपात्र आमदारांची सुनावणी लांबणीवरच…

इंडिया क्लबमध्ये कोण आले आहे?
पीटीआयच्या मते, पत्रकार चंदन थरूर हे इंडिया क्लबच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. त्यांची मुलगी स्मिता थरूर अजूनही लंडनमध्ये राहतात. स्मिता अनेकदा त्यांचा भाऊ काँग्रेस खासदार शशी थरूर आणि इतर कुटुंबीयांसह लंडनच्या क्लबला भेट देत होत्या.

स्मिता सांगतात की स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आणि भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन हे लंडन क्लबच्या येणाऱ्या प्रतिष्ठितापैकी होते. आर्किटेक्चरल डायजेस्टमधील लेखानुसार क्लबच्या भिंती क्लबला भेट दिलेल्या प्रमुख भारतीय आणि ब्रिटीश व्यक्तींच्या फोटोंनी सुशोभित केल्या आहेत. त्यात भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, दादाभाई नौरोजी, तत्त्वज्ञ बर्ट्रांड रसेल, कलाकार एमएफ हुसेन आदींची छायाचित्रे आहेत.भारताचे माजी संरक्षण मंत्री व्ही के कृष्ण मेनन यांचाही इंडिया क्लबच्या स्थापनेत वाटा होता.

इंडिया क्लब आता का बंद होत आहे?
रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, पारशी वंशाचे यादगर मार्कर हे 1997 पासून गोल्डसँड हॉटेल्स लिमिटेडचे ​​संचालक होते. त्यांची पत्नी फ्रॅनी आणि मुलगी फिरोजा यांच्यासोबत ते लंडन क्लब चालवत होते. लंडन क्लब वाचवण्यासाठी त्यांनी ‘सेव्ह इंडिया क्लब’ नावाची चळवळ सुरू केली होती.

COVID-19 लॉकडाऊनमध्ये यूकेमधील अनेक रेस्टॉरंट्स व्यवसायांना फटका बसला आणि भाडेवाढ झपाट्याने झाली. अशा स्थितीत त्याच्या मालकांना इंडिया क्लब चालवणे कठीण झाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube