Maharashtra Politics : सत्तासंघर्षाची ‘सुप्रीम’ सुनावणी; शिवसेना पक्ष अन् 16 अपात्र आमदारांची सुनावणी लांबणीवरच…

Maharashtra Politics : सत्तासंघर्षाची ‘सुप्रीम’ सुनावणी; शिवसेना पक्ष अन् 16 अपात्र आमदारांची सुनावणी लांबणीवरच…

सत्तासंघर्षांसंदर्भातील दोन याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडत आहे. यामध्ये शिवसेना पक्ष (Shivsena) आणि धनुष्यबाण चिन्हावरील सुनावणी 3 आठवड्यांसाठी लांबणीवर तर दुसरी 16 अपात्र आमदारांच्या (Disqualify Mla) प्रकरणावर दाखल याचिकेवर 2 आठवड्यानंतर सुनावणी पार पडणार आहे.

Prithvik Pratap: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप ‘या’ सिनेमात झळकणार 

मागील वर्षी राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या समर्थक आमदारासंह शिवसेनेत बंड केलं. त्यानंतर एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी भाजपशी हातमिळवणी करीत सत्तास्थापन केली आणि स्वत: मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. एवढंच नाहीतर शिंदे यांनी शिवसेना हा आपलाच पक्ष असल्याचा दावा केला. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदेंच्याच शिवसेनेच्या बाजूने निकाल देत धनुष्यबाण बहाल केलं. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhav Thackeray) यांनी निकालाला सर्वोच्च न्यायालयाच चॅलेंज केलं.

संसदेचं विशेष अधिवेशन आजपासून, कोणत्या मुद्दांवर होणार चर्चा? महिला आरक्षणसाठी विरोधी पक्ष आग्रही

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच दिला. त्यात न्यायालयाने बंडखोर आमदारांच्या सदस्यत्वाचा निर्णय सभापतींवर सोपवला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणाचा फेरविचार करण्याचे आवाहन केले.

संजय राऊत टीव्हीवर दिसताच लोक चॅनल बदलतात; शिंदे गटाच्या नेत्याची खोचक टीका

दरम्यान, एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणारी पुनर्विलोकन याचिका आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली. सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. न्यायमूर्ती बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

Brazil Plane Crash : ब्राझीलमध्ये विमानाचा भीषण अपघात! 14 प्रवाशांच्या मृत्यूने खळबळ

सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षावर निकाल दिल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडेच राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत, नूकतीच विधानसभा अध्यक्षांनी विधीमंडळात अपात्र आमदार प्रकरणी सुनावणी पार पडली. सुनावणीत ठाकरे गटाकडून आपल्याला दाव्यांची कागदपत्रे देण्यात आलेली नाहीत, असा आक्षेप घेत शिंदे गटाने कागदपत्रांची मागणी केली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरु असलेली आमदार अपात्रतेची सुनावणी दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली.

दरम्यान, आगामी काळात राज्याच्या सत्तासंघर्षाबाबत महत्वाचा निकाल हाती येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता विधी मंडळात सुनावणी पार पडत असून उद्धव ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या पुर्नविलोकन याचिकेवर आज सुनावणी पार पडली. सुनावणीमध्ये शिवसेना पक्ष चिन्ह आणि 16 अपात्र आमदारांची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube