संसदेचं विशेष अधिवेशन आजपासून, कोणत्या मुद्दांवर होणार चर्चा? महिला आरक्षणसाठी विरोधी पक्ष आग्रही

  • Written By: Published:
संसदेचं विशेष अधिवेशन आजपासून, कोणत्या मुद्दांवर होणार चर्चा? महिला आरक्षणसाठी विरोधी पक्ष आग्रही

Special Session of Parliament : संसदेचे पाच दिवसीय अधिवेशन आजपासून (१८ सप्टेंबर) सुरू होत आहे. या अधिवेशनात सरकार धक्कातंत्र अवलंबून काही अनपेक्षित घडवण्याची चर्चा आहे. या अधिवेशनाची घोषणा करताना संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी हे संसदेचे विशेष अधिवेशन (Special Session of Parliament) असल्याचे सांगितले होते. मात्र हे नियमित सत्र असल्याचे नंतर स्पष्ट करण्यात आले. हे अधिवेशन 22 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

या अधिवेशनाची सुरूवात जुन्या संसद भवनात होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी (19 सप्टेंबर) जुन्या संसद भवनातच फोटो सेशनचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर खासदार नवीन संसद भवनात पोहोचतील. 19 सप्टेंबर रोजी नवीन इमारतीत अअधिवेशाची बैठक होणार असून 20 सप्टेंबरपासून तेथे नियमित कामकाज सुरू होणार आहे.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी करुणा मुंडे मैदानात; केली मोठी घोषणा… 

आज सकाळी 11 ते दुपारी 1 आणि नंतर दुपारी 2 ते 6 या वेळेत सभागृहाचे कामकाज सुरू राहणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 75 वर्षांचा संसदीय प्रवास, कामगिरी, अनुभव आणि आठवणींवर राज्यसभेत चर्चा होणार आहे. पोस्ट ऑफीस विधेयक आणि मुख्य निवडणूक आयुक्त तसेच अन्य आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित विधेयकं राज्यसभेत मांडली जातील. त्यानंतर दोन्ही विधेयके लोकसभेत मांडली जाणार आहेत.

एका अधिकृत माहितीनुसार, अधिवक्ता दुरुस्ती विधेयक 2023 आणि प्रेस आणि नियतकालिक नोंदणी विधेयक 2023 लोकसभेत सादर केले जातील. ही विधेयके ३ ऑगस्ट रोजी राज्यसभेत मंजूर करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त, सरकारला काही नवीन विधेयके किंवा संसदेत सूचीबद्ध नसलेल्या इतर विषयी सादर करण्याचा विशेषाधिकार आहे. त्याबाबतही आडाखे बांधले जात आहेत.

या अधिवेशनात ‘वन नेशन वन इलेक्शन’ आणि देशाचे नाव ‘इंडिया’ वरून ‘भारत’ करण्याचा प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता आहे.

महिला आरक्षण विधेयकासाठी विरोधी पक्ष आग्रही
काल संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी रविवारी (17 सप्टेंबर) सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत संसदेच्या पाच दिवसीय अधिवेशनात अनेक सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याचा प्रस्ताव मांडला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube