मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी करुणा मुंडे मैदानात; केली मोठी घोषणा…

मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी करुणा मुंडे मैदानात; केली मोठी घोषणा…

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवशक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा शर्मा-मुंडे यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी रेणापूर ते मंत्रालयापर्यंत लॉंगमार्च मोर्चा काढणार असल्याची घोषणा मुंडे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा पुढे नेणार असल्याचा निर्धारही व्यक्त केला आहे.

‘बस प्रवास अन् वीज मोफत’; तेलंगणा जिंकण्यासाठी सोनिया गांधींच्या सहा मोठ्या घोषणा…

याआधीही करुन मुंडे अनेकदा चर्चेत आल्या आहेत. 2024 ची विधानसभा निवडणूक कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात लढवणार असल्यची घोषणाही त्यांनी केली. त्यानूसार करुणा मुंडे आगामी निवडणूक परळी मतदारसंघातून लढवणार आहे. त्याच अनुषंगाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या निधीसाठी हा लॉंगमार्च मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

India vs Sri Lanka Final Asia Cup 2023 : सिराजसमोर श्रीलंकेनं गुडघे टेकले, 50 धावांमध्येच गारद…

राज्य सरकारकडून मराठवाड्यासाठी हजारो कोटींचा निधी जाहीर केला असला तरी तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचा गंभीर आरोप करुणा मुंडे यांच्याकडून करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, नूसत्याच घोषणा करुन चालणार नसल्याचा इशाराच त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांसाठी ज्याप्रमाणे गोपीनाथ मुंडे यांनी अनेक आंदोलन केली, मोर्चे काढले. त्याच धर्तीवर राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना एकजूट करून हा लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. तसेच राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा अशी मागणीही त्यांनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube