World cup 2023 मध्ये अश्विनची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री, रोहित शर्माने दिले संकेत

World cup 2023 मध्ये अश्विनची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री, रोहित शर्माने दिले संकेत

World cup 2023 : 5 ऑक्टोबरपासून भारतीय भूमीवर विश्वचषक स्पर्धा (world cup 2023) सुरू होणार आहे. विश्वचषकासाठी भारताचा 15 सदस्यीय संघही जाहीर करण्यात आला आहे. रविचंद्रन अश्विनचा (R. Ashwin) संघात समावेश करण्यात आलेला नाही. मात्र अश्विनसाठी विश्वचषकाचे दरवाजे अद्याप पूर्णपणे बंद झालेले नाहीत, असे कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) म्हटले आहे. त्यामुळे अक्षर पटेलची दुखापत अश्विनसाठी संधी ठरू शकते.

अश्विनला विश्वचषक संघात संधी मिळेल का?
आशिया कपचे जेतेपद पटकावल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने रविचंद्रन अश्विनच्या विश्वचषक खेळण्याबाबत मोठे विधान केले आहे. पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला, ‘फिरकी अष्टपैलू खेळाडू म्हणून अश्विन अजूनही स्पर्धेत आहे. मी सतत त्याच्याशी फोनवर बोलत असतो.’ भारतीय खेळपट्टीवर अश्विनच्या फिरकीची जादू चांगली राहिली आहे. त्यामुळे विश्वचषकात टीम इंडियासाठी तो ट्रम्प कार्ड ठरू शकतो.

रणबीर कपूरचा बहुचर्चित Animal येणार ‘या’ तारखेला; प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर

अक्षरच्या फिटनेसची रोहितने दिली अपडेट
आशिया चषकमध्ये दुखापत झालेल्या अक्षर पटेलच्या फिटनेसबद्दल बोलताना रोहित म्हणाला, ‘अक्षरची दुखापत पाहता, मला वाटते की तो आठवडा किंवा 10 दिवसांत बरा होईल. मला निश्चित माहिती नाही पण पाहावे लागेल त्याची दुखापत कशी सुधारते आहे. काही खेळाडू खूप लवकर बरे होतात आणि मला आशा आहे की अक्षर पटेलही लवकर बरा होईल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिले दोन वनडे खेळू शकेल किंवा नाही, हे खात्रीने सांगता येणार नाही.’

Prasad Khandekar: प्रसाद खांडेकरचा ‘एकदा येऊन तर बघा’, येणार या दिवशी भेटीला

श्रेयस अय्यर किती फिट?
कर्णधार रोहित शर्माने श्रेयस अय्यरच्या फिटनेसबद्दल सांगितले की, ‘श्रेयस अंतिम सामन्यासाठी उपलब्ध नव्हता कारण त्याच्यासाठी काही पॅरामीटर तयार केले होते, जे त्याला पूर्ण करायचे होते. मला वाटते की तो बहुतेक गोष्टी करण्यात यशस्वी ठरला आहे. मी आत्ताच सांगू शकतो की तो 99 टक्के फिट आहे. तो चांगला फिट दिसत आहे आणि त्याने फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात बरेच तास नेटमध्ये घालवले आहेत. मला वाटत नाही त्याची फिटनेस चिंतेचा विषय आहे.’

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube