रणबीर कपूरचा बहुचर्चित Animal येणार ‘या’ तारखेला; प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर

रणबीर कपूरचा बहुचर्चित Animal येणार ‘या’ तारखेला; प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर

Animal Teaser Date Announced: चाहत्यांचा लाडका सध्या रणबीर कपूर त्याच्या बहुचर्चित ‘ॲनिमल’ सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. रणबीर ‘तू झुठी मैं मक्कर’ (Tu Jhoothi Main Makkaar) नंतर ‘ॲनिमल’ (Animal) मध्ये झळकणार असल्याची चर्चा सुरु होती. गेल्या अनेक दिवसांपासून सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेमध्ये सतत बदल होत असल्याचे बघायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Animal The Film (@animalthefilm)


अखेर निर्मात्यांनी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख १ डिसेंबर ठरवली असल्याचे बघायला मिळत आहे. येत्या २८ सप्टेंबर दिवशी अर्थात अभिनेता रणबीर कपूरच्या वाढदिवशी सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात येणार आहे. सिनेमाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता दिसून आली आहे. अवघ्या काही वेळाअगोदरच अभिनेता रणबीरने त्याच्या सोशल मीडियावर (Social media) सिनेमाचा नवा पोस्टर शेअर केल्याचे बघायला मिळत आहे.

नवा पोस्टर शेअर करत असताना अभिनेत्याने सिनेमाच्या टीझरची डेट देखील जाहीर केल्याचे बघायला मिळत आहे. त्याच्या वाढदिवशी ‘ॲनिमल’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित करण्यात येणार आहे. सिनेमाबद्दल प्रत्येक अपडेटवर चाहते लक्ष देऊन आहेत. रणबीर कपूरसह सिनेमामध्ये नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी या कलाकारांच्या मुख्य भूमिका बघायला मिळणार आहे.

Rangiley Funter: शाळकरी जीवनातली धमाल गोष्ट सांगणारा ‘रंगीले फंटर; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

रणबीरने शेअर केलेल्या पोस्टरबद्दल सांगायचं झालं तर, या पोस्टरवर अभिनेत्याचा राऊडी लूक बघायला मिळत आहे. त्याच्या डोळ्याला गॉगल दिसत असून अभिनेत्याच्या तोंडामध्ये सिगारेटही पाहायला मिळत आहे. सिनेमातील अभिनेत्याच्या बॉसी लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. पोस्टरसोबत या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल देखील मोठी अपडेट समोर आली आहे. सिनेमा येत्या १ डिसेंबर दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube