Rangiley Funter: शाळकरी जीवनातली धमाल गोष्ट सांगणारा ‘रंगीले फंटर; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित 

Rangiley Funter: शाळकरी जीवनातली धमाल गोष्ट सांगणारा ‘रंगीले फंटर; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित 

Rangiley Funter Date Out: शाळेच्या अल्लड वयातली धमाल गोष्ट ‘रंगीले फंटर’ (Rangiley Funter) या आगामी सिनेमातून उलगडणार आहे. ( Marathi Cinema) उत्तम स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांनी केलं असून, हा चित्रपट ३ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Social media) नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

ए. के. इंटरनॅशनल मुव्हीजच्या प्रशांत अडसूळ, शशिकांत अडसूळ यांनी ‘रंगीले फंटर’ चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. अक्षय गोरे यांनी कथा, पटकथा, संवाद लेखन, नितीन रायकवार, कौस्तुभ पणत यांनी गीतलेखन, राजा अली यांनी संगीत दिग्दर्शन, राजदत्त रेवणकर यांनी केले आहे. तर छाया दिग्दर्शन, फुलवा खामकर यांनी नृत्य दिग्दर्शन आणि सिद्धेश मोरे यांनी संकलन केलं आहे.

कलादिग्दर्शक म्हणून प्रकाश सिनगारे यांनी काम पाहिले आहे. तसेच कार्यकारी निर्माता म्हणून बाबासाहेब पाटील यानी काम पाहिले आहे. सिनेमातील कलाकरांची नावे अद्याप गुलदसत्यात ठेवण्यात आली असून पोस्टरमध्ये दिसणारी ती चार मुल नेमकी कोण असणार? याबाबत आता चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

Prasad Khandekar: प्रसाद खांडेकरचा ‘एकदा येऊन तर बघा’, येणार या दिवशी भेटीला

‘रंगीले फंटर’ या चित्रपटाच्या पोस्टरवर दोस्तीत कुस्ती नाय पाहिजे अशी टॅगलाइन देण्यात आली आहे. तसेच वाळत घातलेल्या कपड्यांमागे चेहरे लपवलेली चार मुले दिसतात. त्यामुळे शाळकरी मित्रांची धमाल गोष्ट या चित्रपटात असल्याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. त्यामुळे नावाप्रमाणेच हा चित्रपट नक्कीच पुरेपूर मनोरंजन करणारा असेल यात शंका नाही.

Prasad Khandekar: प्रसाद खांडेकरचा ‘एकदा येऊन तर बघा’, येणार या दिवशी भेटीला

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube