प्राइम व्हिडिओवर होणार शोभिता धुलिपालाचा ‘चीकातिलो’ या थरारक तेलुगु क्राइम-सस्पेन्सचा प्रीमियर 23 जानेवारीपासून

प्राइम ओरिजिनल तेलुगु चित्रपट ‘चीकातिलो’ चा वर्ल्डवाइड प्रीमियर 23 जानेवारी रोजी होणार; चीकातिलो हा एक थरारक क्राइम-सस्पेन्स चित्रपट.

  • Written By: Published:
Untitled Design   2026 01 08T130836.294

Shobhita Dhulipala’s ‘Chikatilo’ to premiere on Prime Video on January 23 : भारताचा सर्वात लोकप्रिय एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओने आज घोषणा केली आहे की, प्राइम ओरिजिनल तेलुगु चित्रपट ‘चीकातिलो’ चा वर्ल्डवाइड प्रीमियर 23 जानेवारी रोजी होणार आहे. हैदराबादच्या पार्श्वभूमीवर आधारित चीकातिलो हा एक थरारक क्राइम-सस्पेन्स चित्रपट आहे. या कथेच्या केंद्रस्थानी संध्या आहे. एक ट्रू -क्राइम पॉडकास्टर, ज्याची भूमिका शोभिता धुलिपालाने साकारली आहे. सत्याच्या शोधात निघालेला तिचा प्रवास शहरातील काही अत्यंत भयावह आणि काळे गुपिते उघड करतो.

या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण कोपिशेट्टी यांनी केले असून, डी. सुरेश बाबू यांनी सुरेश प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली निर्मिती केली आहे. कथेचे लेखन चंद्र पेम्माराजू आणि शरण कोपिशेट्टी यांनी केले आहे. चित्रपटात शोभिता धुलिपाला आणि विश्वदेव राचकोंडा प्रमुख भूमिकेत दिसणार असून, चैतन्य विशालक्ष्मी, ईशा चावला, झांसी, आमानी आणि वडलामणि श्रीनिवास महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. हा तेलुगु ओरिजिनल चित्रपट 23 जानेवारीपासून प्राइम व्हिडिओवर भारतासह जगातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये खास प्रदर्शित होणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by prime video IN (@primevideoin)

हैदराबाद शहराच्या गजबजलेल्या पार्श्वभूमीवर घडणारा चीकातिलो हा एक थरारक तेलुगु ओरिजिनल क्राइम-सस्पेन्स चित्रपट आहे. ही कथा संध्या या ट्रू-क्राइम पॉडकास्टरभोवती फिरते. तिच्या इंटर्नच्या गूढ मृत्यूनंतर, न्याय मिळवण्यासाठी चाललेल्या तिच्या अखंड प्रयत्नांत तिला भीषण गुन्ह्यांची एक धक्कादायक साखळी सापडते.

प्राइम व्हिडिओ इंडियाचे ओरिजिनल्सचे डायरेक्टर आणि हेड निखिल माधोक म्हणाले, “प्राइम व्हिडिओवर आम्ही सातत्याने साउथ ओरिजिनल्सची यादी विस्तारत आहोत, ज्या कथा धाडसी, वास्तवाशी जोडलेल्या आणि सर्जनशीलदृष्ट्या वेगळ्या आहेत. सस्पेन्स आणि थ्रिलर या लोकप्रिय शैली असल्या तरी, आमचा भर भावनिक खोली असलेल्या अनोख्या कथांवर आहे. ज्या प्रेक्षकांना आमच्या तेलुगु ओरिजिनल सीरिज धूथामध्ये खूप आवडल्या. आमचा आगामी तेलुगु ॲमेझॉन ओरिजिनल चित्रपट चीकातिलो हीच दृष्टी दर्शवतो.

चीकातिलो ला खास बनवते त्याची सांस्कृतिक प्रामाणिकता, जी पॉडकास्टसारख्या आधुनिक कथाकथन माध्यमांशी सुंदररीत्या जोडलेली आहे आणि कथेत महत्त्वाची भूमिका बजावते. आम्हाला खात्री आहे की, चित्रपटात दाखवलेले जिद्द आणि बंधुभाव यांसारखे सार्वत्रिक विषय तेलुगु भाषिक प्रेक्षकांच्या पलीकडे जाऊन संपूर्ण भारत आणि जगभरातील प्रेक्षकांशी जोडले जातील.

केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनाची घोषणा; 2026-27 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प होणार सादर

या ओरिजिनल चित्रपटाद्वारे सुरेश प्रोडक्शन्ससोबतची आमची दीर्घकालीन भागीदारी अधिक मजबूत करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. चीकातिलो ही दमदार कथा असलेली थ्रिलर आहे आणि 23 जानेवारी रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाल्यावर ती भारत व जगभरातील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.” चीकातिलो चे निर्माते डी. सुरेश बाबू म्हणाले, “चीकातिलो हा बहुपदरी आणि भावनिक सस्पेन्स ड्रामा आहे. या चित्रपटातील सर्वात खास बाब म्हणजे तो अंधाराचा सामना करण्याचे आणि सत्य बोलण्याचे धैर्य दाखवतो. आजच्या समाजाला ज्याची पूर्वीपेक्षा अधिक गरज आहे. या ॲमेझॉन ओरिजिनलसाठी प्राइम व्हिडिओसोबत काम करणे माझ्यासाठी एक उत्कृष्ट अनुभव ठरला आहे.

आमच्या दीर्घकालीन भागीदारीतील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेल्या, वेगळ्या कथा पुढे नेण्याची आमची समान दृष्टी आहे. ज्या केवळ मनोरंजन करत नाहीत, तर प्रेक्षकांशी भावनिक नातंही निर्माण करतात. थरारक कथा आणि प्रभावी अभिनयासह चीकातिलो एक अविस्मरणीय आणि रोमांचक प्रवास देण्याचे आश्वासन देते. 23 जानेवारी रोजी प्राइम व्हिडिओवर होणाऱ्या जागतिक प्रीमियरदरम्यान भारत आणि जगभरातील प्रेक्षकांना हा अनुभव घेता येईल, यासाठी मी उत्सुक आहे.”

follow us