प्राइम व्हिडिओकडून आपल्या नवीन तेलुगू क्राईम थ्रिलर फिल्म ‘चीकाटीलो’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित
प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी इमोशनल तेलुगू क्राईम-सस्पेन्स ड्रामा ‘चीकाटीलो’चा दमदार ट्रेलर रिलीज केला.
The thrilling trailer of the new Telugu crime thriller film ‘Chikatilo’ is out : भारताच्या आघाडीच्या मनोरंजन प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी इमोशनल तेलुगू क्राईम-सस्पेन्स ड्रामा ‘चीकाटीलो’चा दमदार ट्रेलर रिलीज केला. वेगाने बदलणाऱ्या हैदराबादच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी ही कथा संध्या या ट्रू-क्राईम पॉडकास्टरच्या प्रवासावर आधारित आहे. शोभिता धुलिपालाने साकारलेली संध्या आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून गेल्या वीस वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या एका सिरीयल किलरचे गूढ उलगडण्याचा प्रयत्न करते.
या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण कोपिशेट्टी यांनी केले असून निर्मिती डी. सुरेश बाबू यांनी सुरेश प्रॉडक्शन्स प्रा. लि.च्या बॅनरखाली केली आहे. कथा चंद्र पेम्मराजू आणि शरण कोपिशेट्टी यांनी लिहिली आहे. चित्रपटात शोभिता धुलिपाला आणि विश्वदेव राचकोंडा प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार असून, चैतन्य विश्वलक्ष्मी, ईशा चावला, झांसी, आमानी आणि वडलामणि श्रीनिवासही महत्त्वाच्या भूमिकांत झळकणार आहेत. तेलुगू फिल्म ‘चीकाटीलो’चा प्रीमियर 23 जानेवारी रोजी भारतासह जगातील 240 हून अधिक देश व प्रदेशांमध्ये केवळ प्राइम व्हिडिओवर होणार आहे.
तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे; अजितदादांनी पठारे पिता-पुत्रांवर डागली तोफ
‘चीकाटीलो’चा ट्रेलर हैदराबादच्या अंधाऱ्या जगाची एक उत्कंठावर्धक झलक दाखवतो. संध्या ही क्रिमिनोलॉजीची पदवीधर आणि ट्रू-क्राईम पॉडकास्टर असून ती स्वतःला एका धोकादायक मांजर-उंदराच्या खेळात अडकलेली पाहते. एक धक्कादायक खून भूतकाळातील गुन्ह्यांची साखळी उघड करतो आणि सत्य व न्यायाचा शोध अधिक तीव्र होतो. आपल्या पॉडकास्टला तपासाचे साधन बनवत संध्या एका निर्दयी मारेकऱ्याला आव्हान देते आणि त्याला उघड करण्याचा प्रयत्न करते. कथा जसजशी पुढे सरकते तसतसे थरारक उलगडे समोर येतात. पण प्रश्न कायम आहे, सत्य बाहेर येईल का, की संध्या स्वतःच त्या मारेकऱ्याची पुढची शिकार ठरेल? सस्पेन्स आणि भावनांनी भरलेला हा ट्रेलर 23 जानेवारीपासून केवळ प्राइम व्हिडिओवर सुरू होणाऱ्या एका अंगावर काटा आणणाऱ्या अनुभवाची नांदी करतो.
दिग्दर्शक आणि सह-लेखक शरण कोपिशेट्टी म्हणाले, ‘चीकाटीलो’चे दिग्दर्शन करणे माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक ठरले. एका साध्या वाटणाऱ्या गुन्हेगारी कथेमागे दडलेली मानवी आणि अंधारी बाजू दाखवण्याची ही संधी होती. हा चित्रपट फक्त क्राईम-सस्पेन्स नाही, तर धैर्य, शांततेविरुद्धचा संघर्ष आणि न्यायासाठी उभे राहण्याच्या ताकदीची कथा आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांना आम्ही उभारलेल्या त्या रहस्यमय आणि तणावपूर्ण जगाची झलक मिळेल. प्राइम व्हिडिओसोबतची भागीदारी आमच्यासाठी खास आहे, कारण ती आम्हाला ही कथा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी देते. आमच्या कलाकारांनी आपल्या अप्रतिम अभिनयाने या कथेला जीव दिला आहे. 23 जानेवारी रोजी प्राइम व्हिडिओवर प्रेक्षकांनी हा अनुभव घ्यावा, अशी मला आतुरता आहे.”
संध्याची भूमिका साकारणारी शोभिता धुलिपाला म्हणाली, “संध्याचा रोल साकारणे माझ्यासाठी खूप खास अनुभव होता. ती आत्मविश्वासी, निर्भीड तरुणी आहे जी सर्व विरोधांनाही न जुमानता आपल्या विश्वासांवर ठाम उभी राहते. हैदराबादच्या गल्लीबोळांशी जोडलेला हा कॅरेक्टर आणि माझा स्वतःचा सांस्कृतिक संदर्भ जवळचा असल्यामुळे हा प्रवास अधिक सहज आणि आनंददायी ठरला. संपूर्ण कास्ट आणि क्रूने अफाट मेहनत घेतली आहे, त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे. ‘मेड इन हेवन’पासून ते ‘चीकाटीलो’पर्यंतचा प्राइम ओरिजिनलचा प्रवास प्रेरणादायी ठरला आहे. 23 जानेवारीला प्राइम व्हिडिओवर प्रेक्षक मला संध्याच्या रूपात एका नव्या अंदाजात पाहतील, अशी मला आशा आहे.”
