एक्सपीरियन्स द एक्स्ट्राऑर्डिनरी! अल्लू अर्जुनने इशाऱ्यांत दिले पुढील भव्य प्रोजेक्टचे संकेत?

Experience the Extraordinary :  नॅशनल अवॉर्ड विजेता अल्लू अर्जुन हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक आहे. आपल्या

Experience The Extraordinary

Experience the Extraordinary :  नॅशनल अवॉर्ड विजेता अल्लू अर्जुन हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक आहे. आपल्या दमदार उपस्थितीने तो प्रत्येकवेळी प्रेक्षकांची मनं जिंकतो. खरा पॅन-इंडिया स्टार म्हणून त्याला देशभरातून प्रचंड प्रेम मिळत आहे. पुष्पा 2: द रूलच्या जबरदस्त यशानंतर आता त्याचा पुढचा प्रोजेक्ट काय असेल, याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

अशातच अल्लू अर्जुनने (Allu Arjun) एका पोस्टद्वारे काहीतरी मोठं येणार असल्याचे संकेत दिले आहेत. सोशल मीडियावर अल्लू अर्जुनने एक GIF शेअर केला आहे, ज्यामध्ये तो ब्लॅक आउटफिटमध्ये अत्यंत स्टायलिश दिसतो. कॅमेरा मागून पुढे येत त्याच्याकडे फिरतो आणि समोर असलेल्या गेटवर “Experience the Extraordinary” असे लिहिलेले दिसते.

या ओळीने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली असून, नेमकं कोणतं खास ‘एक्सपीरियन्स’ प्रेक्षकांच्या वाट्याला येणार आहे, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. यासोबतच अल्लू अर्जुनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, दरम्यान, अल्लू अर्जुन सध्या बॉक्स ऑफिसवरही वर्चस्व गाजवत आहे. 1800 कोटींच्या वर्ल्डवाइड लाइफटाइम कमाईसह तो अजूनही बॉक्स ऑफिस चार्ट्सवर अव्वल स्थानावर आहे, आणि हा विक्रम अद्याप कोणत्याही चित्रपटाला मोडता आलेला नाही.

सिस्पेच्या हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी CBI चौकशी; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा-

त्यामुळे हा आकडा कोण पार करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आता अल्लू अर्जुन पुढे काय घेऊन येणार, याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. मात्र एक गोष्ट नक्की आयकॉन स्टारचा पुढचा प्रोजेक्ट मोठ्या पडद्यावर आला, तर तो भव्य आणि जबरदस्तच असणार, यात शंका

follow us