कॉंग्रेस खासदार Shashi Tharoor यांच्या पीएला अटक; सोने तस्करी प्रकरणी कारवाई

कॉंग्रेस खासदार Shashi Tharoor यांच्या पीएला अटक; सोने तस्करी प्रकरणी कारवाई

Shashi Tharoor PA arrested with Gold Delhi airport : काँग्रेसचे खासदार शशी थरूर ( Shashi Tharoor ) यांचे पीए शिव कुमार यांच्यावर सीमा शुल्क विभागाने सोने तस्करी प्रकरणी कारवाई केली आहे. याप्रकरणी त्यांना अटक देखील झाली आहे. असं सांगण्यात येत आहे की, शिव कुमार हे दिल्ली विमानतळावर ( <strong>Delhi airport ) परदेशातून पाठवण्यात आलेलं सोनं ताब्यात घेत होते. त्याचवेळी ही कारवाई करण्यात आली.

‘त्या’ चुकीमुळे तापमान थेट 52 डिग्री पार; Delhi Temperature मागील सत्य आलं समोर

गेल्या काही दिवसांमध्ये सीमा शुल्क विभागाने सोना तस्करी प्रकरणी कडक कारवाई केली आहे. यामध्ये श्रीलंकन नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. तसेच वेगवेगळ्या कारवाईमध्ये सीमा शुल्क विभागाने तब्बल 1.23 कोटी रुपयांच्या किमतीच्या सोनं ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर आता थेट काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचे पीए शिव कुमार यांच्यावर सीमा शुल्क विभागाने सोने तस्करी प्रकरणी कारवाई केली आहे.

विजय ताड खून प्रकरण : दीड वर्षापासून फरार असलेला माजी नगरसेवक अखेर शरण

दरम्यान सध्या लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपवर टीका करणे, त्याचबरोबर इंडिया आघाडीचे नेते म्हणून वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे शशी थरूर हे नेहमीच चर्चेत असतात. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीच्या विजयानंतर पंतप्रधान कोण असणार? याबाबत विधान केलं आहे. ते म्हणाले की, इंडिया आघाडी विजयानंतरच पंतप्रधानांचं नाव निश्चित करेल. तसेच आघाडीमध्ये अनेक नेते आहेत. जे पंतप्रधान पदाचा चेहरा ठरू शकतात. तसेच 2004 च्या निवडणुकीमध्ये देखील पंतप्रधानांच नाव निश्चित नव्हतं. त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले होते.

नार्को टेस्टमध्ये मी निर्दोष आढळलो तर संन्यास घेणार का? अजित पवारांचे दमानियांना जोरदार प्रत्युत्तर

तर याच पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. थरूर म्हणाले होते की, पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळामध्ये संसदीय लोकशाहीला अध्यक्षीय लोकशाही प्रमाणे चालवलं जात आहे. त्यामुळेच भाजपकडून निवडणुकीच्या अगोदरच पंतप्रधान पदाचे नाव निश्चित केलं जातं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज