विजय ताड खून प्रकरण : दीड वर्षापासून फरार असलेला माजी नगरसेवक अखेर शरण

विजय ताड खून प्रकरण : दीड वर्षापासून फरार असलेला माजी नगरसेवक अखेर शरण

Vijay Tad Murder Case : सांगलीच्या जतमधील भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड (Vijay Tad) खून प्रकरणातील फरार आरोपी माजी भाजप नगरसेवक उमेश सावंत अखेर न्यायालयात हजर झाला. उमेश सावंत (Umesh Sawant) हा गेल्या दीड वर्षापासून फरार होता. सांगली पोलिसांनी उमेश सावंत याला फरार घोषित करून बक्षीसही जाहीर केले होते. दरम्यान, आज तो न्यायालयात हजर झाला असता त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.

नार्को टेस्टमध्ये मी निर्दोष आढळलो तर संन्यास घेणार का? अजित पवारांचे दमानियांना जोरदार प्रत्युत्तर 

तब्बल दीड वर्षानंतर सावंत स्वत: सांगली न्यायालयात हजर झाला आहेत. यानंतर सांगली पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला ताब्यात घेतले.

अधिक माहीती अशी की, जत-शेगाव रस्त्यावरील शाळेत शिकत असलेल्या मुलांना घेण्यासाठी विजय ताड 17 मार्च 2023 रोजी आपल्या कारने निघाले होते. त्याचवेळी संदीप उर्फ ​​बबलू शंकर चव्हाण व त्याच्या तीन साथीदारांनी रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडून व डोक्यात दगड घालून विजय ताड यांचा खून केला. या राजकीय खुनाच्या घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरला होता. या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने संदीप उर्फ ​​बबलू शंकर चव्हाण याच्यासह त्याच्या तीन साथीदारांना गोकाक (कर्नाटक) येथून अटक केली होती. या चौघांनीही उमेश सावंतच्या सांगण्यावरून विजय ताडची हत्या केल्याची कबुली दिली होती.

अशोक चव्हाणांना सोबत घेऊनही भाजपची दमछाक? नांदेडमध्ये काँग्रेसचं पारडं जड 

अनैतिक संबंधाच्या संशयातून विजय ताड यांची हत्या झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तेव्हापासून उमेश सावंत हा फरार होता. आता उमेश सावंतच्या अटकेनंतर तपासात खरे कारण समोर येईल. त्यामुळे जत पोलिसांच्या तपासाकडे लक्ष लागले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज