नार्को टेस्टमध्ये मी निर्दोष आढळलो तर संन्यास घेणार का? अजित पवारांचे दमानियांना जोरदार प्रत्युत्तर

नार्को टेस्टमध्ये मी निर्दोष आढळलो तर संन्यास घेणार का? अजित पवारांचे दमानियांना जोरदार प्रत्युत्तर

Ajit Pawar on Anjali Damania : पुण्यातील अल्पवयीन आरोपीने पोर्श कारने (Porsche car accident) अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना धडक दिली होती. या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच अजित पवार यांची नार्को टेस्ट (Narco test) करण्याची मागणीही त्यांनी केली होती. दरम्यान, या मागणीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

अशोक चव्हाणांना सोबत घेऊनही भाजपची दमछाक? नांदेडमध्ये काँग्रेसचं पारडं जड 

अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना अंजली दमानिया यांनी केलेल्या नार्को टेस्टच्या मागणीबाबत विचारले असता ते म्हणाले की, मी नार्को टेस्ट करण्यास तयार आहे. मात्र, नार्को टेस्टमध्ये मी निर्दोष आढळलो तर तिने (अंजली दमानियांना) पुन्हा मीडियासमोर यायचे नाही. गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा, असं अजित पवार म्हणाले.

अग्रवालच्या महाबळेश्वरमधील बेकायदेशीर रिसोर्टवर बुलडोझर फिरवा, मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश 

पुढं बोलतांना ते म्हणाले, पुणे अपघात प्रकरणी मुख्यमंत्री आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी कोणताही हस्तक्षेप न करता प्रकरण हाताळण्याचं पोलिसांना सांगितले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि योग्य तपास करण्याचे आदेशही दिले आहेत. या प्रकरणात ज्या मुलाने अपघात घडवला, तो आतमध्ये आहे. त्याचे वडील आत आहेत. त्याच्या बापाचा बापही आत आहेत. कायद्यानुसार जो तपास व्हायला हवा होता तो सुरू आहे. या प्रकरणात कोणी दोषी असेल…. मग त्यात अजित पवार जरी दोषी असला तरी त्याच्यावर कारवाई होईल, असं अजित पवार म्हणाले.

अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या होत्या?
पुणे पोर्श कार अपघातावर बोलताना अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले होते. त्या म्हणाल्या की,अजित पवारांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केल्याचे काही लोक सांगत आहेत. माझ्याही मनात तीच शंका होती. कारण सुरूवातीचे चार दिवस अजित पवार काहीच बोलले नाहीत. रोज सकाळी उठून काम वगैरे करतो असे सांगणारे अजित पवार या अपघाताबाबत गप्प बसले होते. प्रत्येक वेळी सुनील टिंगरे यांचे नाव पुढे येत होतं. ही सगळी सारवासारव कुणासाठी चालली होती? असा सवाल दमानियांनी केला होता.

पुढे बोलताना या प्रकरणी अजित पवार धादांत खोटं बोलत आहेत. अजित पवारांकडून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यामुळं अजित पवारांचा फोन जप्त करून त्यांची नार्को टेस्ट करावी, असेही अंजली दमानिया म्हणाल्या होत्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज