पोर्शे कार अपघातावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, श्रीमंताच्या बापाचा पोरगा असला तरी…

पोर्शे कार अपघातावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, श्रीमंताच्या बापाचा पोरगा असला तरी…

Ajit Pawar On Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील पोर्शे कार अपघात (Porsche Car Accident) प्रकरणात पुणे (Pune) जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते.  मात्र आता आज पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी या प्रकरणात भाष्य केला आहे.

माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, पाचव्या टप्प्यातील निवडणुका संपल्यानंतर मी 21 आणि 22 मे रोजी मंत्रालयात होतो, त्या काळात पुण्यात ज्या घटना घडल्या त्यावर मी लक्ष ठेवून होतो. कल्याणीनगर परिसरातील पोर्शे कार अपघात प्रकरणात माझं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी बोलणं झालं आहे. त्यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घातलं आहे. मात्र काही लोकांकडून कारण नसताना या प्रकरणात पालकमंत्र्यांचं लक्ष नाही असा गैरसमज केला जात आहे मात्र मी माझा काम करत असतो. असं अजित पवार म्हणाले.

कितीही श्रीमंताच्या बापाचा पोरगा असला तरी कारवाई होणार

पुढे माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, या संपूर्ण प्रकरणात कोणत्याही राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप नाही. ही घटना अतिशय गंभीर आहे. यामुळे कुणावरही आकस बुद्धीने काही कारवाई होणार नाही. मात्र जो कुणी दोषी असतील ते कितीही मोठे असेल, कितीही श्रीमंत असले किंवा कितीही श्रीमंताच्या बापाचा पोरगा असला तरी रितसर जी काही कारवाई असेल ती कारवाई केली जाईल. कायदा सर्वांना सारखा आहे. कायदा सुव्यवस्था राखणं हे पोलिसांची जबाबदारी आहे. असं देखील यावेळी अजित पवार म्हणाले.

राज्य सरकारची ‘ती’ मागणी योग्यच! शरद पवारांनी दिला सरकारला पाठिंबा

19 मे च्या पहाटे भरधाव पोर्शे कार चालवून बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दोन जणांचा जीव घेतला होता. या प्रकरणात त्याला सुरुवातील अवघ्या एका दिवसात जामीन मिळाला होता मात्र त्यानंतर त्याचा जामीन रद्द करून त्याला 14 दिवसांसाठी बाल निरीक्षणगृहात पाठवण्यात आले आहे. तर दुसरीकडे बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांची देखील पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज