lok Sabha Election : देवेंद्र फडणवीसांनी राज्य पिंजून काढले ! 52 दिवसांत विक्रमी 115 सभा

  • Written By: Published:
lok Sabha Election : देवेंद्र फडणवीसांनी राज्य पिंजून काढले ! 52 दिवसांत विक्रमी 115 सभा

Lok Sabha Election Devendra Fadnavis A record 115 meetings in 52 days : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे (BJP) स्टार प्रचारक असलेले व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य पिंजून काढले आहे. फडणवीसांनी राज्यभरात तब्बल 52 दिवसांच्या प्रचाराच्या झंझावातामध्ये विक्रमी 115 सभा घेतल्या आहे. महायुती, महाविकास आघाडीतील नेत्यांपेक्षा देवेंद्र फडणवीसांनी सर्वाधिक सभा घेतल्या आहे. भाजपबरोबर राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाच्या उमेदवारांसाठी ही देवेंद्र फडणवीसांनी सभा घेऊन प्रचाराची राळ उडवून दिली होती. राज्यातील लोकसभा निवडणूक (Loksabha election) पाच टप्प्यात होती. आज पाचवा टप्प्याचा प्रचार संपुष्टात आला असून, तेरा जागांवर सोमवारी मतदान होत आहे. शनिवारी त्यांनी भिवंडीत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यासाठी सभा घेतली. ही त्यांची 115 वी सभा होती.

पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीत 26 मार्च रोजी त्यांनी पहिली सभा चंद्रपुरात घेतली. सुधीर मुनगंटीवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची ही सभा होती. 50 वी सभा ही नांदेड उत्तरमध्ये येथे 22 एप्रिल रोजी झाली. 1 ते 50 सभांचे अंतर पार करायला 26 दिवस लागले. 100 वी सभा पुणे येथे 11 मे रोजी झाली. त्यामुळे 51 ते 100 या पुढच्या 50 सभा 15 दिवसांत झालेल्या आहेत.


मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेचा फटका निवडणुकीत ठाकरे गटाला बसणार ?

आज भिंवडीत समारोपाची झालेली सभा ही 115 वी सभा होती. पहिली सभा ते आजची शेवटची सभा असे सलग एकूण 52 दिवस हा प्रचारसभांचा क्रम सुरु होता. या 52 दिवसांत 115 सभा करतानाच देवेंद्र फडणवीस यांनी विविध माध्यमांना एकूण 67 मुलाखती दिल्या. यात 35 मुलाखती या मुद्रीत माध्यमांना, 22 मुलाखती या इलेक्ट्रॉनिक माध्यमांना तर 8 मुलाखती या डिजिटल माध्यमांना होत्या. 2 मुलाखती या राष्ट्रीय साप्ताहिकांना होत्या. , आर्थिक मुद्दे, देशाच्या सुरक्षाविषयक मुद्दे, राज्य सरकारच्या माध्यमातून झालेल्या स्थानिक विकासाचे मुद्दे, हिंदूत्त्व अशा बाबी त्यांच्या भाषणातून मांडल्या गेल्या.

निवडणुकीत आतापर्यंत 8889 कोटींच्या वस्तू जप्त, रोकड आणि ड्रग्जचा आकडा मोठा

प्रत्येक टप्प्यात वेगळे मुख्यालय

या संपूर्ण 5 टप्प्यात स्थानिक गरजेनुसार, त्यांनी आपले निवासाचे मुख्यालय ठेवले. पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात नागपूर हे मुख्यालय होते. तिसर्‍या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर, जळगाव, पुणे अशा ठिकाणी मुक्काम केले. चौथ्या टप्प्यात प्रामुख्याने पुण्यात मुक्काम असायचा. पाचव्या टप्प्यात मुंबईत रात्रीचा मुक्काम केला. कार्यकर्त्यांच्या भेटी, पदाधिकार्‍यांच्या बैठका असा क्रम सभांनंतर सुरुच असायचा. याशिवाय, संतवचन नावाने संतांचे अभंग, ओवींचा आधार घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम समाजमाध्यमांतून दररोज एका ग्राफिक्सच्या माध्यमातून मांडण्याचे काम सुद्धा त्यांनी केले. सुमारे 40 भागांची ही मालिका राहिली, जी 20 मेपर्यंत सुरु राहणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज