मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेचा फटका निवडणुकीत ठाकरे गटाला बसणार ?

  • Written By: Published:
मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेचा फटका निवडणुकीत ठाकरे गटाला बसणार ?

Thackeray group get hit in the election due to hoarding incident in Mumbai: मुंबईतील घाटकोपरमधील सर्वांत मोठे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 18 नागरिकांना प्राण गमवाले लागले आहेत. एेन लोकसभा निवडणुकीच्या मुंबईतील प्रचारादरम्यान ही घटना घडली आहे. या होर्डिंगवरून राजकीय आरोप -प्रत्यारोप होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मुंबईत रोड शो केला होता. त्यावर उद्धव ठाकरे/strong> (Uddhav Thackeray) व इतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. भाजपवर (bjp) आरोप करत असलेले उद्धव ठाकरेंचा होर्डिंग दुर्घटनेतील आरोपीबरोबर फोटो समोर आला आहे. त्यामुळे थेट पुरावाच समोर आल्याने उद्धव ठाकरेंचे प्रतिमा मलिन झाल्याचे बोलले जात आहे. त्याचा थेट मुंबईतील निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसू शकतो.

निवडणुकीत आतापर्यंत 8889 कोटींच्या वस्तू जप्त, रोकड आणि ड्रग्जचा आकडा मोठा

घाटकोपर दुर्घटना घडल्यानंतर यातील आरोपी व इगो मीडिया कंपनीचा मालक आरोपी भावेश भिंडे हा मुंबई सोडून फरार झाला होता. परंतु गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपी भिंडे याला कुठल्याही परिस्थिती शोधून काढण्याचा सूचना मुंबई पोलिसांना दिल्या होत्या. मुंबई गुन्हे शाखेने राजस्थानमधील उदयपूर येथून आरोपी भिंडेला अटक केली आहे. भिंडे पोलिस कोठडीत असून, त्याच्याकडे पोलिस चौकशी करत आहेत. हळूहळू भिंडेचे ठाकरे कनेक्शनसारख्या धक्कादायक गोष्टी पुढे आल्या.

अवैधरीत्या गर्भपात करणाऱ्या आशा वर्कर महिलेसह तिघांना अटक; गोळ्यांची कीट जप्त

भिंडेचे ठाकरे कनेक्शन दाखवणारा आणखी एक फोटो समोर आला आहे. भिंडेला अनधिकृत होर्डिंग लावण्याची परवानगी ठाकरे सरकारच्या काळात मिळाल्याचा आरोप झाला. यातसुद्धा टक्केवारी घेता, यालाही ठाकरेही जबाबदार असे म्हणत राम कदम यांनी निशाणा साधला. ठाकरे सरकार याला जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.

मात्र ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी भावेश भिंडेचा आमच्याशी काही संबंध नाही, असं म्हणत हात झटकले. मात्र भावेश भिंडेचा ठाकरेंसोबत फोटो व्हायरल झाला आणि ठाकरे गटाची अडचण होऊ लागली. त्यातच आता भिंडेचे ठाकरे गटाशी असणारे कनेक्शन सांगणारा आणखी एक फोटो पुढे आलाय. यामुळे ठाकरे गटाची आणखी गोची झाली आहे. या फोटोत भावेश भिंडेसोबत संजय राउतचा भाऊ सुनील राउत दिसून येत आहेत.

सरकारची मदत, उद्धव ठाकरेंचे मौन

मृतांच्या नातेवाईकांना सरकारने पाच लाखांची मदत जाहीर केली. पण सामनाचे संपादक संजय राऊत यांनी चकार शब्द निघाला नाही. उद्धव ठाकरेंनीही या विषयावर मौन बाळगले आहे. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळण्याच्या घटनेने अनेक बाबी समोर आल्या. भिंडेचे ठाकरे-राऊत कनेक्शन पुढे आले. दुसरे म्हणजे घटनेनंतर ज्या वेगाने सूत्रे हलली, त्यावरून देवेंद्र फडणवीस यांची कर्तव्यतत्परता दिसून आली. या होर्डिंग प्रकरणाचा फटका उद्धव ठाकरेंना निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज