अवैधरीत्या गर्भपात करणाऱ्या आशा वर्कर महिलेसह तिघांना अटक; गोळ्यांची कीट जप्त

अवैधरीत्या गर्भपात करणाऱ्या आशा वर्कर महिलेसह तिघांना अटक; गोळ्यांची कीट जप्त

Woman Arrested Illegal Abortion Case : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील वाळूज भागातील बकवालगरमध्ये गर्भपात प्रकरण समोर आलं आहे. हे प्रकरण गंगापूर येथील आरोग्य विभागाने जानेवारी महिन्यात उघडकीस आणलं होतं. (Diagnosis Case) त्यावेळी या प्रकरणाची सुत्रधार महिला फरार झाली होती. दरम्यान, तिला आता पैठण तालुक्यातील रहाटगावातून अटक करण्यात आली आहे. (Pregnancy Diagnosis) याबाबत वाळूज पोलिसांनी माहिती दिली. या महिलेने कबूली जबाब दिल्यानंतर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. तसंच त्यांच्याकडून गर्भपाताच्या गोळ्यांची कीट जप्त केली.

 

इंदुरीकर महाराजांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक

केंद्रावर गर्भलिंग निदान

गावात कोणत्याही व्यक्तिला आरोग्याची समस्या येऊ शकते. तसंच, यामध्ये महिलांच्या आरोग्याबाबद अनेक प्रश्न असतात. त्यामुळे आशा वरकर गावपातळीवर काम करतात. त्या अनुषंगाने येथे या महिलेची आशा वर्कर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मदर बिल्डींगमधून ही महिला आरोग्य सेवा देण्याचं काम करत होती. दरम्यान, हे होत असताना या केंद्रात गर्भलिंग निदान चाचणी करून महिलांचा गर्भपात केला जात आहे अशी तक्रार काही महिलांनी केली होती. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं होतं.

 

 

पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी

याबाबतची तक्रार पुणे आोग्य विभागाला देण्यात आली होती. तक्रार प्राप्त होताच गंगापूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमेश पवार यांच्या पथकातील डॉ. सुदाम लगास यांनी 30 जानेवारीला पोलिसांनी बकवालनगर गाठले. तेथे पथकाने याविषयीची चौकशी करून वाळूज पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रा दिली होती. या प्रकरणाच्या अनेक दिवसांपासून हेल्पलाईनवरून आरोग्य विभागाला तक्रारी होत असल्याचंही यामध्ये समोर आलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज