धक्कादायक! छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी महापौरांना जनावरासारखी मारहाण, मंत्री शिरसाट आक्रमक

Chhatrapati Sambhajinagar येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात उमेदवाराच्या प्रतिनिधीचा पोलिसांशी वाद, वादातून पोलिसांचा लाठीचार्ज

Chhatrapati Sambhajinagar

Lathi charge on candidate’s representative, huge chaos at polling station in Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात उमेदवाराच्या प्रतिनिधीला आत प्रवेश देण्यावरून पोलिसांशी वाद झाला. या वादातून पोलिसांनी उमेदवाराच्या प्रतिनिधीवर लाठीचार्ज केला. या घटनेमुळे मतदान केंद्र परिसरात मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

चुरस वाढली! पुण्यात पोस्टल मतांमध्ये भाजप 24 जागांवर आघाडीवर

या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. मतमोजणीच्या ठिकाणी जाण्यावरून झालेल्या अनेकांवर लाठीचार्ज करण्यात आला. ज्यामध्ये त्यांच्या शरीरावर व्रण उमटले आहेत. विकास जैन अशा मारहाण झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. त्यांच्यासह शिवसेनेचे तीन ते चार कार्यकर्ते जखमी झाले आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो. ज्यामध्ये कार्यकर्त्यांच्या किंकाळ्या, आरोळ्या आणि आक्रोश ऐकायला येत आहे. या घटनेनंतर शिवसेना शिंदे व त्याचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

Municipal Corporation Election Result : छ.संभाजीनगरमध्ये मोठा राडा; माजी महापौराला मारहाण

छत्रपती संभाजीनगर शहरातील पॉलिटेक्निक कॉलेज येथे सकाळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाल्यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कार्यकर्त्यांची विचारपूस केली. यावेळी माजी महापौर विकास जैन यांना मारहाण झाल्याची घटना घडली असून ते जखमी झाल्याचे दिसून येत आहे.

follow us