live now
Municipal Corporation Election Result : छ.संभाजीनगरमध्ये मोठा राडा; माजी महापौराला मारहाण
Maharashtra Municipal Corporation Election Result 2026 : राज्यातील 29 महापालिकांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल
Maharashtra Municipal Corporation Election Result 2026 : राज्यातील 29 महापालिकांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. आज सकाळी 10 पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
छत्रपती संभाजीनगर भाजपापेक्षा AIMIM आघाडीवर
छत्रपती संभाजीनगर भाजपापेक्षा AIMIM आघाडीवर
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे सुरुवातीचे कल समोर येत असून एमआयएमने पाच जागांवर आघाडी घेतली आहे तर भाजप 4 जागांवर आघाडीवर आहे. तर दोन्ही शिवसेना 3-3 जागांवर आघाडीवर आहे.
-
अहिल्यानगर महापालिका निवडणूक : MIM ला देखील पोस्टल मतदान
Ahilyanagar Municipal Corporation Election
अहिल्यानगर महापालिका निडणूकीसाठी झालेल्या पोस्टल मतदानात एमआयएमला देखील मतदान झाले आहे. पोस्टल मतदानमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप आघााडीवर आहे.
-
छत्रपती संभाजीनगर निकाल : टपाल मोजणी कल
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून टपाल मोजणीत ठाकरे गट 8 जागांवर तर एमआयएम 4 जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे भाजप 12 आणि शिवसेना शिंदे गट 8 जागांवर आघाडीवर आहे.
छत्रपती संभाजीनगर निकाल : टपाल मोजणी कल
आघाडी
भाजप 12
शिवसेना 8
शिवसेना ठाकरे गट 8
एमआयएम 4
-
मुंबईत पुन्हा ठाकरे? 16 जागांवर आघाडीवर
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून मुंबईत 16 जागांवर शिवसेना आणि मनसे युतीचे उमेदवार आघाडीवर आहे.
-
पोस्टल मतांमध्ये भाजपला आघाडी
पोस्टल मतांमध्ये भाजपला आघाडी
पोस्टल मतांमध्ये भाजप सोलापूरमध्ये 16 जागांवर आघाडीवर आहे. पुण्यात भाजप 24 जागांवर आघाडीवर आहे.
-
पोस्टल मतदान म्हणजे काय? जाणून घ्या सर्वकाही
Postal Voting :
काही मतदारांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाता येत नाही, म्हणून त्यांना पोस्टाने मत देण्याची परवानगी असते. उदा.
सरकारी कर्मचारी (निवडणूक ड्युटीवर असलेले)
पोलिस, होमगार्ड
सैन्य दलातील जवान
काही अपंग / वृद्ध मतदार
हे लोक पोस्टल बॅलेट पेपर भरून टपालाने पाठवतात.निवडणूक निकालाच्या दिवशी
EVM मशीनची मोजणी सुरू होण्यापूर्वी
आधी पोस्टल मतांची मोजणी केली जाते
नंतर ती मते उमेदवारांच्या एकूण मतांत जोडली जातातमहत्त्वाची गोष्ट
पोस्टल मतसंख्या कमी असते, पण
चुरशीच्या लढतीत (कमी फरक असल्यास) पोस्टल मते निकाल बदलू शकतात
-
महापालिका निवडणूक : पोस्टल मतमोजणीला सुरूवात
Municipal Corporation Election
राज्यातील 29 महापालिका निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असून आता पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
-
राज्यातील टॉप १० महापालिकांमधील मतदानाची टक्केवारी
मुंबई महानगरपालिका - ५२.९४ टक्के
ठाणे महानगरपालिका - ५५.५९ टक्के
नवी मुंबई महानगरपालिका- ५७.१५ टक्के
पुणे महानगरपालिका- ५२.४२ टक्के
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका- ५७.७१ टक्के
नागपूर महानगरपालिका- ५१ टक्के
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका- ५९.८२ टक्के
कल्याण डोंबिवली महानगरपालिका- ४५ टक्के
वसई-विरार महानगरपालिका - ५७.१२ टक्के
मीरा-भाईंदर महानगरपालिका- ४८.६४ टक्के
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, उमेदवाराच्या प्रतिनिधीला पोलिसांकडून लाठीचार्ज
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election
महानगरपालिका निवडणूक निकालाआधी छत्रपती संभाजीनगरमधून मोठी घडामोड समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये असणाऱ्या शासकीय इंजीनियरिंग कॉलेजमध्ये उमेदवाराच्या प्रतिनिधीला आत मध्ये येण्यावरून पोलिसांमध्ये वाद झाला.
यावरून पोलिसांनी उमेदवारांच्या प्रतिनिधीला लाठीचार्ज केला. मतदान केंद्रावर हा मोठा राडा झाला आहे. पोलिसांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये राडा.. विकास जैन असं पोलिसांकडून मारहाण करण्यात आलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याचे नाव आहे.
-
अहिल्यानगर महापालिका निवडणूक : उमेदवारांच्या प्रतिनिधीला आत सोडण्याची प्रक्रिया सुरु
Ahilyanagar Municipal Corporation Election
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या अहिल्यानगर महापालिकेच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार असून अहिल्यानगर येथील MIDC वखार महामंडळ, गोडाऊन नंबर 7 येथे मत मोजणी सकाळी 10 वाजता सुरु होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवारांच्या प्रतिनिधीला आत सोडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
