मोठी बातमी! पुणे पोर्श अपघात प्रकरणी पोलिसांचीही चौकशी होणार, आयुक्तांनी दिले आदेश

मोठी बातमी! पुणे पोर्श अपघात प्रकरणी पोलिसांचीही चौकशी होणार, आयुक्तांनी दिले आदेश

Pune Porsche Accident : पुण्यातील कल्याणीनग येथे पोर्श गाडीची (Pune Porsche Accident) धडक देऊन दोन जणांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीच्या विरोधात आता वातावरण चांगलंच तापलं. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवा (Vijay Wadettiwar) पोलिसांच्या (Yerwada Police) कृतीवरच शंका घेत पोलिसांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता या अपघातप्रकरणी येरवडा पोलिसांच चौकशी होणार आहे.

सुगाव घटनेतील मृत जवानांच्या कुटुंबियांना शासनाकडून दहा लाखांची मदत जाहीर; मंत्री विखेंची माहिती 

कल्याणीनगर अपघात प्रकरणी आता येरवडा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी होणार आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. दोन एफआयआर का नोंदवण्यात आले कोणी दबाव आणला का? त्या अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी कधी करण्यात आली? आदी गोष्टींचा तपास होणार आहे. याशिवाय, अल्पवयीन मुलाला व्हीआयपी सेवा दिल्याबद्दलही पोलिसांची चौकशी होणार आहे. या चौकशीत पोलिस दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे अमितेश कुमार यांनी म्हटले आहे.

कल्याणमध्ये ठाकरे पालटणार बाजी की शिंदे राखणार गड, बालेकिल्यात कोणाला मिळणार विजय? 

सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या नेतृत्वाखालील समिती येवरडा पोलिलांची चौकशी करणार आहे.

अग्रवाल पिता-पुत्राच्या जबाबात तफावत…
गुरुवारी सकाळपासून पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना समोरासमोर बोलावलं होतं. दोघांची कसून चौकशी करण्यात आली. अल्पवयीन मुलाची वागणूक, या घटनेपूर्वी त्याचे वर्तन कसे होते? दोघांनाही त्याच्या जीवनशैलीबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. मात्र, दोघांच्या उत्तरात तफावत जावणली.

अल्पवयीन मुलाच्या मित्रांचीही होणार चौकशी…
दरम्यान, आता या अल्पवयीन मुलासोबत असलेल्या अन्य दोन अल्पवयीन मुलांच्या पालकांचीही चौकशी केली जाणार आहे. त्यातील एक मित्र दिल्लीचा आहे. पोलिसांनी दिल्लीतील मित्राला चौकशीसाठी बोलावले आहे. दिल्लीहून येताना पालकांना सोबत आणण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागही अॅक्शन मोडवर
या अपघातानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागही अॅक्शन मोडवर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तीन दिवसांत एकूण 32 परवाने रद्द केले आहेत. यामध्ये 10 रूफटॉप हॉटेल, 16 पब आणि 6 बार समाविष्ट आहेत. याशिवाय 297 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज