Pune Condhwa Rape Case : पुणे सुरक्षितच! शहराला बदनाम करु नका, पोलिस आयुक्तांचं आवाहन

Pune Condhwa Rape Case : पुणे सुरक्षितच! शहराला बदनाम करु नका, पोलिस आयुक्तांचं आवाहन

Pune Condhwa Rape Case : पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत एका 25 वर्षीय मुलीवर डिलीव्हरी बॉयने (Pune Condhwa Rape Case ) बलात्कार केल्याची घटना 3 जुलै रोजी समोर आली होती. या घटनेनंतर संबंधित मुलीने पोलिस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर तक्रारदार मुलगीच फितूर असल्याचं समोर आलंय. पुणे शहरात खोट्या तक्रारी देऊन शहराला बदनाम करु नका, असं आवाहनही पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलं. यासंदर्भात पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी माहिती दिलीयं.

पीडित मुलीने खोटी तक्रार दाखल केल्याचं तपासात समोर आलं आहे. मुलीने आपल्या तक्रारीत एक कहाणी तयार केली असून पोलिसांनी आपल्या आधुनिक संसाधनांचा वापर करुन या प्रकरणाचा छडा लावला आहे. या प्रकरणामध्ये पीडित मुलीने खोटी तक्रार दिल्याचं निष्पन्न झालंय, त्यामुळे कोणीही खोट्या तक्रारी देऊन पुणे शहराला बदनाम करु नये, असं आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलंय.

माळेगाव कारखान्या’च्या चेअरमनपदी निवड होताच अजित पवार अपात्र?, विरोधकांचा आक्षेप काय?

पीडित तरुणी मुळची अकोल्याची असून पुण्यात एका खाजगी कंपनीत डेटा सायंटिस्ट म्हणून नोकरी करीत आहे. पीडित मुलगी भावासोबत कोंढवा परिसरात वास्तव्यास आहे. 3 जुलै रोजी भाऊ गावी गेल्याने पीडीत मुलगी घरात एकटीच होती. यावेळी डिलिव्हरी बॉयने सोसायटीत प्रवेश मिळवला. त्यानंतर पीडितेच्या घराची बेल वाजवली. यावेळी माझं पार्सल नसल्याचं पीडितेने सांगितलं पण त्यानंतरही तुम्हाला सही करावी लागणार असल्याचं आरोपीकडून सांगण्यात आलं. पीडितेने सही करण्यास सेफ्टी दरवाजा उघडताच डिलिव्हरी बॉयने आत प्रवेश केला.

मनसे स्टाईल दणका, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं

आत प्रवेश करताच डिलिव्हरी बॉयने पीडितेच्या तोंडावर स्प्रे मारुन बलात्कार केला असल्याचं पीडित महिलेने तक्रारीत म्हटलं होतं. एवढंच नाही तर आरोपीने पीडितेच्या मोबाईलवर सेल्फी काढत मी परत येणार असल्याचा मेसेजही टाईप करुन ठेवला.

दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण पुणे जिल्हा हादरुन गेला. या घटनेची एकच खळबळ उडाल्यानंतर पोलिसांनी अत्याचार प्रकरणाचा तपास वेगाने सुरु केला होता. या तपासाअंत मुलगी खोटं बोलत असल्याचं समोर आलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube