पुणे महापालिकेच्या मोटार वाहन विभागाचा मोठा निर्णय; पावणे पाचशे वाहने काढली भंगारात
केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी जुन्या वाहनांना भंगारात काढण्यासाठी धोरण लागू केले आहे. १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांची आरटीओ

Pune Municipal Corporation Motor Vehicle Department : पुणे महापालिकेच्या मोटार वाहन विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. येथील ताफ्यातील पावणे पाचशे वाहनांचे आयुष्य संपलं असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ही वाहने वापरणे शक्य नसल्याने त्यांचा महापालिका लिलाव करून त्यांना सेवेतून बाहेर काढणार आहे. एमएसटीसी या संकेतस्थळावर लिलाव होणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी ही माहिती दिली.
महापालिकेकडे सध्या एकूण १,१६३ वाहने असून त्यामध्ये अधिकाऱ्यांची वाहने, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, अग्निशमन दल, अतिक्रमण विभाग, विद्युत, उद्यान, आकाश चिन्ह, मलनिःसारण यासह आदी विभागांमध्ये या वाहनांचा वापर केला जातो. गेल्या काही वर्षापासून अधिकाऱ्यांसाठी नवीन वाहन खरेदी करण्याऐवजी सात वर्षांसाठी वाहने भाड्याने घेतले जात आहेत. त्यामुळे त्यांची देखभाल दुरुस्ती महापालिकेला करावी लागत नाही.
नगर-पुणे रेल्वेमार्गासाठी टास्कफोर्स हवा; खासदार लंकेंचे रेल्वे बोर्डाच्या चेअरमनला साकडे
केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी जुन्या वाहनांना भंगारात काढण्यासाठी धोरण लागू केले आहे. १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांची आरटीओ नोंदणी करून केली जात आहे. त्यानुसार, महापालिकेने गेल्या दोन वर्षांपासून ४७३ वाहने सेवेतून बाद केली असून, यातील काही वाहने २४ ते १५ वर्षे जुन्या होत्या. सेवेतून बाहेर काढलेली ही वाहने गुलटेकडीतील मोटार वाहन विभागाच्या आवारात तसेच कोंढवा आणि हडपसर येथील महापालिकेच्या जागेत ठेवण्यात आली होती.
जागेच्या कमतरतेमुळे या वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी हे काम आरटीओकडे सोपवण्यात आले होते, मात्र त्यांना त्यात यश आले नाही. अखेर पुणे महापालिकेनेच लिलाव प्रक्रिया हाती घेतली असून, हा लिलाव ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे. हा लिलाव मंगळवारी दुपारी १२ ते दुपारी ४ या वेळेत पार पडणार आहे.