पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचं ठरलं; महापालिका निवडणुकांना सोबतच सामोरे जाणार

पुणे महानगरपालिकेत काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेनेच्या एकत्र निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब; पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही घोषणा.

  • Written By: Published:
Untitled Design (172)

It’s decided between Thackeray’s Shiv Sena and Congress in Pune : राज्यामध्ये महापालिका निवडणुकांचा पडघम वाजलेला असताना पुण्यात राजकीय हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे(Pune) महानगरपालिकेत काँग्रेस(Congress) आणि ठाकरेंची शिवसेनेच्या(Shivsena UBT) एकत्र निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आज पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिन अहिर(Sachin Ahir) आणि काँग्रेसचे सतेज पाटील(Satej Patil) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पुण्यात सोबत महापालिका निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. रविवारी रात्री या दोन्ही नेत्यांत महत्वाची बैठक पार पडली होती त्यानंतर आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आली आहे.

अहिल्यानगर निवडणूक : शिंदे, विखे पाटील आणि संग्राम जगताप…तिघांचा मेळ बसेना

पत्रकार परिषदेत काँग्रेसचे सतेज पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे सचिन अहिर यांनी पुणे महापालिका निवडणूक सोबत लढवणार असल्याचं जाहीर केलं. जागावाटपाबाबतची घोषणा देखील यावेळी करण्यात आली. पुणे महानगरपालिकेत काँग्रेस 60 जागा लढवणार असून ठाकरेंची शिवसेना 45 जागांसाठी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत. हा आकडा प्राथमिक असून फायनल यादी आज संध्याकाळपर्यंत समोर येईल असं सतेज पाटील यांच्याकडून सांगण्यात आलं. त्याचप्रमाणे वंचितसोबत देखील आमची सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

BMC Election : भाजपचा ‘डॅमेज’ कंट्रोलचा प्रयत्न; मुंबईसाठी ‘मराठी’ कार्ड खेळत दिली अनेकांना संधी

पुण्यात रविवारी रात्री ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिन अहिर, काँग्रेसचे सतेज पाटील यांच्यात बैठक झाली होती. दरम्यान मनसे नेत्यांनी देखील या दोन्ही नेत्यांची भेट घेतली होती. या तिन्ही पक्षात महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने महत्वाची बैठक पार पडली. मनसेच्या भूमिकेवर अजूनही काही फायनल झालं नसून चर्चा सुरू असल्याचं सांगण्यात आलं.

follow us