अहिल्यानगर निवडणूक : शिंदे, विखे पाटील आणि संग्राम जगताप…तिघांचा मेळ बसेना

Ahilyanagar मध्ये मनपासाठी महायुती होणार की युती याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही तर महाविकास आघाडी देखील वेट अँड वॉच भूमिकेमध्ये आहे

Ahilyanagar Municipal Corporation

MVA in wait and watch also Mahayuti too for Ahilyanagar Municipal Corporation elction : राज्यभरात महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून अनेक ठिकाणी युती महायुती आघाडी यामध्ये अद्यापही मोठी संभ्रमाची अवस्था आहे. अशीच काहीशी परिस्थिती अहिल्यानगरमध्ये दिसून येत आहे मनपासाठी महायुती होणार की युती याबाबत अद्या प कोणतीही घोषणा झालेली नाही तर दुसरीकडे महाविकास आघाडी देखील वेट अँड वॉच भूमिकेमध्ये आहे शिवसेना शिंदे गटाला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजप यांच्यामध्ये बैठका सुरू आहे मात्र काही जागेवरून तेढ निर्माण झाल्याने अद्याप महायुतीबाबत कोणतीही घोषणा नेत्यांकडून करण्यात आलेली नाही.

शिंदेंशी चर्चा सुरू असतानाच भाजपची पहिली यादी जाहीर! मुंबई मनपासाठी कोणा-कोणाला उमेदवारी?

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणसंग्राम तापू लागलेल्या असताना महायुतीमधील अंतर्गत मतभेद हे चव्हाट्यावरती येऊ लागले आहेत 23 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होऊ लागली असली तरी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांच्या जागावाटप अद्यापही रखडलेलेच आहे यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये देखील संभ्रमाची अवस्था असून जागावाटपाबाबत कधीपर्यंत निर्णय होणार याकडे इच्छुकांसह नागरिकांचे देखील लक्ष लागून आहे.

भाजपला घराणेशाही नकोच! पुण्यात आमदार खासदारांच्या मुलं अन् नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचा निर्णय

महापालिका निवडणूक महायुती म्हणूनच लढवण्याचा निर्धार राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजपकडून करण्यात आला आहे यासाठी नाराज असलेल्या शिंदे घाटाला देखील सोबत घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार असे देखील नगर शहराचे आमदार संग्राम जगताप व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने गटासोबत चर्चा सुरू असून लवकरच यावरती तोडगा निघाला जाईल असं सांगण्यात येत आहे मात्र अहिल्यानगर मनपा निवडणुकीत युती होणार की महायुती याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे

जागं वाटपावरून रस्सीखेच

राष्ट्रवादी व भाजपमध्ये सातत्याने बैठका होत जागरण बाबत देखील चर्चा होऊन त्या निश्चित करण्यात आले आहे मात्र शिवसेना शिंदे गटाकडून आपल्या विद्यमान जागा वरती दावा केला जात असल्याने जागा वाट पाहून सुरू असलेली ही रस्सीखेच यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडतो आहे सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार गट कडून 32 जागांचा प्रस्ताव तर भाजपकडून 30 जागांचा प्रस्ताव केला आहे तर शिंदे घाटाने आपल्या विद्यमान 24 जागांचा दावा केला आहे या आकड्यांवर अद्याप एकमत झालेल्या नसल्याने महायुतीबाबत अध्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही

नेमकं घोडं कुठे आणलं

महानगर निवडणुकीपूर्वी लोकसभा विधानसभा निवडणुकीची देखील या घटनेला किनार आहे शिवसेना शिंदे गटात असलेले काही नगरसेवक हे पूर्वी भाविकास आघाडी कडून होते त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखे यांच्या विरोधात प्रचार करणाऱ्यांमध्ये देखील त्यांचा समावेश होता तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये देखील ऐनवेळी बदललेली राजकीय भूमिका व युतीकडे वाटचाल यामुळे राष्ट्रवादीसह भाजप देखील सेनेच्या काही इच्छुकांवरती नाराज आहे. यामुळे शिंदे गट सोबत नाही आला तरी युती म्हणून आम्ही निवडणूक लढवू असं काही भाजप पदाधिकारी खाजगीत सांगतात.

शिंदे गटाच्या मॅरेथॉन बैठका

अहिल्यानगर मनपाला शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो यातच नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने शिवसेनेने विजयामध्ये आघाडी घेतली त्यामुळे आता कुठेतरी मनपा निवडणुकीमध्ये देखील सन्मान जनक जागा मिळाल्या पाहिजे अशी मागणी पदाधिकारी करतात तसेच सन्मान जनक जागा न मिळाल्यास शिंदे सेना वेगळा निर्णय घेऊ शकतील अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महायुती मध्ये सामील व्हायचे की नाही याबाबत देखील शिंदेसेने कडून बैठका घेत अंदाज घेतला जातो आहे. यामुळे शिंदे सेना काय निर्णय घेणार हे एक-दोन दिवसात स्पष्ट होईल

आघाडीची वेट अँड वॉच ची भूमिका

एकीकडे महायुतीचे अद्याप जागावाटपावरून घोडे अडले असून दुसरीकडे महाविकास आघाडीत देखील केवळ वेट अँड वॉच भूमिकेमध्ये आहे. आघाडीची जबाबदारी हे खासदार निलेश लंके यांच्या खांद्यावर आहे जागा वाटप रखडल्याने महाविकास आघाडी मधील इच्छुकांमध्ये देखील मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. दरम्यान महायुती झाली नाही तर शिंदे घाटातील नाराज तसेच भाजपमधील अंतर्गत असलेले नाराज यांना तिकीट डावलण्यात येऊ शकते असे काही जण आघाडीच्या संपर्कात असल्याचा देखील दावा आघाडीतील काहींकडून केला जातो आहे.

येत्या दोन दिवसात चित्र स्पष्ट होणार

महापालिका साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असून महायुती संदर्भातील अवघ्या काही जागांवर चर्चा ही अंतिम टप्प्यात राहिल्या असल्याने लवकरच निर्णय घोषित करणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली तसेच आज होणाऱ्या बैठकीमध्ये माहिती बाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आघाडी कडून देखील जागांबाबत अंतिम निर्णय झाला असून लवकरच तो जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

follow us