यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त असणार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची ग्वाही…

Pune Ganesh Festival: यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav 2025) निर्बंधमुक्त आणि भयमुक्त राहील. कोणतेही एकतर्फी निर्बंध लादले जाणार नाहीत, अशी ग्वाही पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी दिली. ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.
जिल्हाधिकाऱ्याच्या कानाखाली मारली अन् छावा संघटना चर्चेत; काय आहे या संघटनेचा इतिहास?
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ आयोजित ‘राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२४’ (पुणे शहर महानगरपालिका क्षेत्र विभाग) चा पारितोषिक वितरण समारंभ गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडला. यावेळी अमितेश कुमार बोलत होते. यावेळी बोलताना अमितेश कुमार म्हणाले की, गेल्या ३० वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शहरांत उत्ववात बंदोबस्त केलाय. पुण्याच्या उत्सवाचे स्वरुप विशाल आहे. यंदाचा बंदोबस्त हा सोयी-सुविधांनी युक्त असणार आहे. आमदार हेमंत रासनेंची एक विनंती होती की, गणेशोत्सव निर्बंधमुक्त असावा… 100 टक्के गणेशोत्सव निर्बंधमुक्त आणि भयमुक्त असणार आहे. पोलिस आणि प्रशासनाकडून कोणतेही एकतर्फी निर्बंध लादले जाणार नाहीत. मागच्या वर्षी ज्या परवानग्या दिल्या होत्या, त्याच परवानग्या कायम राहतील. यावर्षी पोलीस स्टेशनला जाऊन परवनागी घेण्याची गरज नाही, असं अमितेश कुमार म्हणाले.
‘सत्यभामा’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक टिझर प्रदर्शित; 8 ऑगस्ट रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
पुढं बोलताना ते म्हणाले की, मागील वर्षी गणेशोत्सवामध्ये ज्या अटी आणि शर्तीवर गणपती उत्सव साजरा झाला, त्याच अटी यावर्षीही लागू असतील. तसेच कोणी कायदा सुव्यवस्था बाधित करण्याचा प्रयत्न केला, शांतता आणि सुव्यवस्था बिघडवली, किंवा महिलांच्या छेडछाडीच्या घटना घडल्यास पोलिस विभागांकडून कडक कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले.
यावेळी जगद्गुरू कृपांकित डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर, आमदार हेमंत रासने, माजी आमदार उल्हास पवार, माजी महापौर अंकुश काकडे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, माणिक चव्हाण, माणिक चव्हाण आदी उपस्थित होते.