Pune : गणेशोत्सव अन् दहीहंडीत पारंपारिक वाद्यांचा नाद घुमणार, उद्योजक बालन यांची घोषणा

Pune : गणेशोत्सव अन् दहीहंडीत पारंपारिक वाद्यांचा नाद घुमणार, उद्योजक बालन यांची घोषणा

Punit Balan : यंदाचा गणेशोत्स (Ganeshotsav) आणि दहीहंडी (Dahihandi) डीजेचा तालावर साजरी न करता पारंपारिक वाद्य वाजनाने साजरी करणार आहोत, अशी भूमिका पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष तथा पुनीत बाल (Punit Balan) यांनी घेतली आहे. बालन यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश 

लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत बालन यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. गणेशोत्सव आणि दहीहंडीविषयी बोलताना ते म्हणाले की, आमच्या दहीहंडीत गेल्या वर्षी डीजे लागला होता. पण, तेव्हा आमचा उद्देश वेगळा होता. आधी प्रत्येक 50 मीटरवर दहिहंडी साजरी होत होती. ते आम्ही बंद केलं. आम्ही 35 मंडळांना एकत्र आणलं आणि पारंपारिक वाजनाने दहीहंडी साजरी केली होती. नंतर डीजे लागला, पण डीजेवर भक्तीभावाचे गाणे लागले होते, असं बालन म्हणाले.

ते म्हणाले, आज विसर्जन मिरवणुकीत अनेक डीजे पाहतो. आपल्या संस्कृती-परंपरा डीजेवर अश्लील गाणे लावून साजरं करणं, त्या गाण्यांवर नाच-गाणं करणं योग्य नाही. आपण घरी डीजे लावून नाचत नाही, मग रस्त्यावर का नाचतो?, असा सवाल त्यांनी केला. तसेच वारीची परंपरा साडेतीनशे वर्षाची आहे. वारकरी टाळ-मृदंगावर नाचत-गाजत वारीला जातातत, ते डीजेलावून वारीला जात नाही, असंही बालन म्हणाले.

‘समोरसमोर चर्चा करू, मी महायुतीकडून येतो, तुम्ही…’; शंभूराज देसाईंचं पृथ्वाराज चव्हाणांना ओपन चॅलेंज 

मी डीजेमुक्त गणेशोत्सव करणार आहे. दहीहंडी देखील डीजेच्या तालावर साजरी न करता पारंपारिक वाद्य वाजनाने साजरी करणार आहोत. एकही डीजे लावणार नाही, असं बालन यांनी सांगितलं.

तुम्ही राजकारणासाठी हे सगळं करता का?, असा सवाल केला असता पुनीत बालन यांनी सांगितले की, 2019 ला मी गणेशोत्सवात आलो, तेव्हा सर्वांना वाटलं मी विधानसभा लढवेल. पण लढलो नाही. लोकसभाही लढलो नाही. कसबा पेठ पोटनिवडणुक लढेल, असंही अनेकांना वाटलं. मात्र, मी लढलो नाही. माझं ते कार्यक्षेत्र नाही. मी धार्मिक-सामाजिक कामात रमणं हा माझा पिंड आहे, असं बालन यांनी सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube