मनसे स्टाईल दणका, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं

Sushil Kedia : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेवरुन चांगलेच राजकारण तापले आहे. यातच उद्योजक सुशील केडिया यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना धमकी दिल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. उद्योजक सुशील केडिया (Sushil Kedia) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज ठाकरे मुंबईत गेल्या 30 वर्षांपासून मी राहतो पण मला मराठी व्यवस्थित येत नाही. तुम्हाला काय करायचंय बोला असं म्हटले होते. तर आता संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी उद्योजक सुशील कोडिया यांच्या मुंबईमधील ऑफिसची तोडफोड केली आहे.
माहितीनुसार, मनसे कार्यकर्त्यांनी कडेया यांच्या ऑफिसवर दगडफेक करत जोरदार घोषणाबाजी केली आहे. तर दगडफेक करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तर दुसरीकडे राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्याने वरळी डोममध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र विजयी मेळावा घेत आहे. या मेळाव्यासाठी संपूर्ण राज्यातून कार्यकर्त्ये जमा झाले असून आता ठाकरे बंधू काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
ठाकरे बंधू एकत्र येणार, मनसे- ठाकरे गटाची युती होणार? अनिल परबांनी स्पष्टच सांगितले
नेमकं काय म्हणाले होते उद्योजक सुशील केडिया?
सुशील केडिया यांनी मराठी भाषा वादावरुवन सोशल मीडियावर पोस्ट करत आपण मराठी भाषा शिकणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, राज ठाकरे याची नोंद घ्या की, मी मुंबईत गेल्या 30 वर्षांपासून राहतो पण मला व्यवस्थित मराठी येत नाही. आता तुमचं यासंदर्भातलं बेफाम गैरवर्तन पाहता मी हा पण केला आहे की, जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मरठी माणसाचे कैवारी म्हणून वावरत आहेत तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, काय करायचंय बोला असं उद्योजक सुशील केडियांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.