मराठी-हिंदी भाषा वादात राज ठाकरेंच्या नातवाची एन्ट्री; दादांच्या आमदारानं नवी वात पेटवली….

मराठी-हिंदी भाषा वादात राज ठाकरेंच्या नातवाची एन्ट्री; दादांच्या आमदारानं नवी वात पेटवली….

Amol Mitkari Criticize Raj Thackeray On Marathi : हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अतिशय टोकाची भूमिका घेतली होती. सरकारने अखेर हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेतला. या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा पाच जुलै रोजी विजयी मेळावा पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, ठाकरे कुटुंब हे भारतीय भाषांना विरोध करतं, परंतु इंग्रजी भाषेला पायघड्या घालतात. तर अमित आणि आदित्य ठाकरे यांचं शिक्षण इंग्रजी (Marathi School) शाळेतून झालंय. यावर बोलताना अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी म्हटलंय की, इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या लोकांनी मराठीवर बोलणं, हेच खूप हास्यास्पद होतं.

हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेल्या टोकाच्या भूमिकेला यश आलं असून, राज्य सरकारने हिंदी सक्तीचा शासन निर्णय अखेर मागे घेतला आहे. यानंतर आता ५ जुलै रोजी राज ठाकरेंचा ‘विजयी मेळावा’ पार पडणार आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर आता राजकीय टोलेबाजी सुरू झाली आहे.

‘एक तिची गोष्ट’ नाटकाचा प्रीमियर सोहळा उत्साहात, उत्तम अभिनय अन् नृत्याची अदाकारी..

मिटकरींचा ठाकरेंवर निशाणा

निदान आजोबा म्हणून तरी आपल्या मुलांना ते मराठी शाळेमध्ये टाकतील, अशी अपेक्षा आम्ही करतो असा टोला अमोल मिटकरी यांनी ठाकरेंना लगावला आहे. नाव न घेता त्यांनी राज ठाकरे नातवाला मराठी शाळेत शिकवतील ही अपेक्षा, मराठी माणूस म्हणून करतो, असं मिटकरी यांनी म्हटलंय. मिटकरी यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आणि ठाकरेंच्या मराठीप्रेमाला कृतीत उतरवण्याचं आव्हान दिलं.

दरम्यान, हिंदी सक्तीच्या जीआरवरून निर्माण झालेला वाद, आणि त्यात ठाकरेंनी घेतलेली भूमिका, तसेच सत्ताधाऱ्यांकडून येणारी टीका. यामुळे राज्यातील भाषा-राजकारण पुन्हा एकदा तापलेलं दिसत आहे.

पहिल्या नोकरीचं डबल सेलिब्रेशन! सरकार देतंय 15 हजार, योजनेचा लाभ कसा मिळणार?

सुनील शेळकेंवरील आरोप…

आमदार सुनिल शेळके यांनी सरकारची लाखो रूपयांची रॉयल्टी बुडवली, असा आरोप केला जातोय. यावर बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलंय की, संजय राऊत यांना शंका येत असेल, तर त्यांनी तसे पुरावे त्यांनी मुख्यमंत्र्‍यांना द्यावा. शेळके यांचा व्यवसाय आहे, हे संपूर्ण मावळ तालुक्याला माहित आहे. माझा पूर्ण परिवार त्या व्यवसायात आहे. जर राऊत साहेबांकडे पुरावे असतील, तर त्यांनी ते मुख्यमंत्र्यांकडे द्यावे, असं सुनिल शेळके यांनी सांगितल्याचं मिटकरींनी म्हटलंय. संजय राऊत केवळ मनाच्या समाधानाकरिता केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. त्यातून त्यांना असुरी आनंद मिळतो, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.

स्वत: अनेक लोक संपर्क करत आहेत. अनेक आमदार अस्वस्थ आहेत. त्यांना करमेनासं झालंय. दोन-तीन आमदार काल देवगिरीवर होते. ते दादांना अॅटिंचेंबरमध्ये भेटले. आम्हाला जरा वेळ द्या असे म्हटले. दादांनी वेळ दिल्यानंतर त्यांचाही तुम्हाला पक्षप्रवेश दिसेल, असं सूचक वक्तव्य यावेळी अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube