कल्याणमध्ये ठाकरे पालटणार बाजी की शिंदे राखणार गड, बालेकिल्यात कोणाला मिळणार विजय?

कल्याणमध्ये ठाकरे पालटणार बाजी की शिंदे राखणार गड, बालेकिल्यात कोणाला मिळणार विजय?

Kalyan Lok Sabha 2024 : शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) फुटीनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) संपूर्ण राज्याचे लक्ष कल्याण लोकसभा मतदारसंघात (Kalyan Lok Sabha) लागले आहे. या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. यामुळे या मतदारसंघात शिवसेना फुटीनंतर देखील श्रीकांत शिंदे पुन्हा एकदा निवडून येणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

मात्र श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी या मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी घडत होते. कल्याण मतदारसंघात यावेळी भाजपकडून (BJP) देखील निवडणूक लढवण्याची जोरात तयारी सुरू होती. त्यामुळे कल्याण मतदारसंघात महायुतीकडून (Mahayuti) भाजप की शिवसेना कोण उमेदवार देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. मात्र शेवटी, एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली होती.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून (MVA) या लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात वैशाली दरेकर (Vaishali Darekar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. यामुळे या मतदारसंघात मुख्य लढत श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर अशी पाहायला मिळाली. पाचव्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघात 50.12 टक्के मतदान झाला असून त्यामध्ये पुरुष मतदारांचे प्रमाण 52.19 टक्के तर महिला मतदारांचे प्रमाण 47.75 टक्के आणि इतर मतदारांचे प्रमाण 21.63 टक्के इतके आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातून 52.19 टक्के झाले तर सर्वात कमी मतदान अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातून 47.06 टक्के इतके झाले आहे.  2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी 4 टक्के मतदान जास्त झाल्याने या मतदारसंघात कोण बाजी मारणार? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघात 46.16 टक्के मतदान झाले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांनी 3,44,343 मतांनी विजय मिळवला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी बाळाराम पाटील यांच्या पराभव केला होतं.

कल्याण मतदारसंघाची इतकी चर्चा का ?

बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या नावावरून राजकारण सुरू करणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघ बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मुंब्रा-कळवा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या निवडणुकीमुळे ही निवडणूक एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे.

2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अगदी सहज श्रीकांत शिंदे यांनी विजय मिळवला होता मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याने या मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांच्यासाठी परिस्थिती पूर्णपणे बदलेली होती. यावेळी त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात आल्याने त्यांना मतविभाजनाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात स्वतः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) प्रचार केल्याने श्रीकांत शिंदे यांच्यासमोर विजयासाठी मोठा आव्हान निर्माण झाला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघात शिवसेनेचा वर्चस्व पाहायला मिळत आहे. 2009, 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराने विजय मिळवले होते. यामुळे आपल्या बालेकिल्ल्यात विजय मिळवण्यासाठी आणि आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची मानली जात आहे.

हिंदी भाषिक प्रांतीय मतदार ठरणार गेम चेंजर ?

कल्याण लोकसभा मतदारसंघात हिंदू मतदारांची संख्या 80-85 टक्के आहे तर मुस्लिम मतदारांची संख्या 10-15 आणि अन्य मतदारांची संख्या 0-5 टक्के आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात बहुतांश लोक उत्तर भारतीय आहे यानंतर सिंधी, मारवाडी, शीख, राजस्थानी, गुजराती, जैन आणि पंजाबी आहेत. याशिवाय सुमारे दोन लाख इतर प्रांतीय मतदार आहेत. त्यात दक्षिण भारतातील आसाम, ओडिशा, हिमाचल प्रदेश आदी राज्यांतील लोकांचाही समावेश आहे. मात्र या निवडणुकीत ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून प्रचारामध्ये खरी शिवसेना आणि खोटी शिवसेना, सहानभूती या सारख्या मुद्यांवर प्रचार झाल्याने याचा कोणाला फायदा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रश्न

कल्याण लोकसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे, याव्यतिरिक्त वाहतूक कोंडी आणि फेरीवाले या प्रमुख समस्या आहेत. मात्र यावेळी खरी शिवसेना आणि खोटी शिवसेनाच्या लढाईत महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत स्थानिक मतदार व्यक्त करत आहेत. यामुळे या मतदार संघाबाबत सध्या अनेक मतप्रवाह दिसून येत आहे. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात यावेळी कोण बाजी मारणार  हे 4 जून रोजी स्पष्ट होणार.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे राजकीय समीकरणे

कल्याण लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जितेंद्र आव्हाड आमदार आहे. तर अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेना (शिंदे गटा) चे बालाजी किणीकर आमदार आहे. उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात भाजपचे कुमार आयलानी आमदार आहे.

वेदांत, विशाल अन् आता आजोबा; अख्ख अग्रवाल कुटुंब चौकशीच्या फेऱ्यात

डोंबिवली विधानसभा मतदारसंघात रविंद्र चव्हाण आमदार आहे तर मनसेचे प्रमोद पाटील कल्याण ग्रामीणमधून आमदार आहे आणि कल्याण पूर्वमधून भाजपचे गणपत गायकवाड आमदार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज