मोठी बातमी! कल्याणमध्ये ठाकरे बदलणार उमेदवार? माजी महापौरांचा अर्ज दाखल

मोठी बातमी! कल्याणमध्ये ठाकरे बदलणार उमेदवार? माजी महापौरांचा अर्ज दाखल

Kalyan Lok Sabha 2024 : पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात कल्याण लोकसभा मतदारसंघ (Kalyan Lok Sabha) चर्चेत आला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून (Mahayuti) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे तर ठाकरे गटाकडून या मतदारसंघात वैशाली दरेकर (Vaishali Darekar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, या मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अडचणीत वाढ करण्यासाठी ठाकरे गटाकडून मोठी खेळी खेळली जाणार असल्याची चर्चा आहे. कल्याण मतदारसंघात ठाकरे गटाकडून आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यामुळे श्रीकांत शिंदे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

ठाकरे गटाकडून माजी महापौर रमेश जाधव (Ramesh Jadhav) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माहितीनुसार, ठाकरे गट 6 तारखेला एबी फॉर्म बदलणार आहे यामुळे या मतरदारसंघात ठाकरे गटाकडून उमेदवार बदलला जाणार का? याची देखील चर्चा आता होत आहे. 2014 आणि 2019  मध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला होता मात्र यावेळी शिवसेनेत फूट पडल्याने ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे.

वाशिम रोडवर भीषण अपघात, आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील 4 जण ठार

महायुतीकडून विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सध्या त्यांच्याकडून या मतदारसंघात जोरदार प्रचार होताना दिसत आहे तर ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या वैशाली दरेकर देखील जोरदार प्रचार करत आहे. यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याने लक्ष लागून आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube