वाशिम रोडवर भीषण अपघात, आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील 4 जण ठार

वाशिम रोडवर भीषण अपघात, आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील 4 जण ठार

Kiran Sarnaik : वाशिम रोडवर (Washim Road) दोन कारची एकमेकांना जोरदार धडक झाली आहे. यातील एक कार अमरावतीचे (Amravati) शिक्षक आमदार किरण सरनाईक (MLA Kiran Sarnaik) यांच्या भावाची होती.

या भीषण अपघातामध्ये 7 जणांचा मुत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. मुत्यू झालेल्या नागरिकांमध्ये आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील 4 जणांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारचा अपघात अकोला जिल्ह्यातील पातूर शहराजवळ वाशिम रोड झाला. दुपारी 3 च्या सुमारास हा अपघात झाला असल्याची माहिती असून या अपघाताची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पवार कुटुंबातील मुलांशी लग्न केल्याने आम्ही पवार, सुप्रिया सुळे रक्ताने पवार

मृतांमध्ये या लोकांचा समावेश

माहितीनुसार, या अपघातात आमदार किरण सरानाईक यांचे पुतणे रघुवीर सरनाईक (वय 28), शिवाजी आमले (वय 30), सिद्धार्थ यशवंत इंगळे (वय 35) आणि एका नऊ महिन्याच्या मुलाचा मुत्यू झाला आहे तर या भीषण अपघातात तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज