पुणे कार अपघात प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कडक शिक्षा द्या; पटोलेंची मागणी

पुणे कार अपघात प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कडक शिक्षा द्या; पटोलेंची मागणी

Nana Patole : पुण्यातील कल्याणीनगर येथे पोर्श गाडीची (Pune Porsche Accident) धडक देऊन दोन जणांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीच्या विरोधात आता वातावरण चांगलंच तापलं. या अपघात प्रकरणावरून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे देखील आक्रमक झाले आहेत. पुणे अपघात प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी आणि दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणी पटोलेंनी केली.

पुणे पोर्श अपघात प्रकरणात ‘ड्रग्ज’ कनेक्शन? अल्पवयीन आरोपीच्या दोन मित्रांची चौकशी होणार… 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात नाना पटोले यांनी लिहिलं की, पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात शनिवारी मध्यरात्री भरधाव वेगात असलेल्या कारने दुचाकीला धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना अतिशय गंभीर आहे. एक अल्पवयीन मुलगा ही कार बेदरकारपणे चालवत होता आणि तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आतापर्यंतच्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. ही घटना गंभीर असतानाही पुणे पोलिसांनी याप्रकरणी हलगर्जीपणा केल्याचं उघड झालं. कार चालक मुलगा वेदांत अग्रवाल याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही, त्याला तातडीने बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आणि जामिनावर सुटका करण्यात आली. दोघांचा जीव घेण्यास कारणीभूत ठरलेल्या त्या आरोपीला जामीन देतांना अत्यंत किरकोळ अटी घातल्या होत्या. त्यात अपघात या विषयावर निबंध लिहिण्यास सांगितलं होतं. हे हास्यास्पद आणि संतापजनक आहे, असं पटोले म्हणाले.

Tamanna Bhatia चा ‘अरनमनाई 4’ ने जगभरात जमवला 100 कोटींचा गल्ला 

पुणे पोलिसांवर दबाव होता का?
दोन जणांचा बळी घेणाऱ्या कार चालकाची अवघ्या 15 तासात सुटका होणे अत्यंत गंभीर असून, गरीब आणि श्रीमंतांना वेगळे कायदे असल्याचं यातून स्पष्ट होतं. राज्यभरातील जनतेने तीव्र संताप व्यक्त केल्यानंतर मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं. घटना गंभीर असतानाही पंधरा तासांत आरोपीची सुटका होऊ शकते, हे अनाकलनीय आहे. यामुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत. पुणे पोलिसांवर दबाव होता का? ज्यामुळं आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला. आरोपीची वैद्यकीय तपासणी का झाली नाही? आणि त्याला ताबडतोब कोर्टात हजर करून जामीन मिळावी, याची तजवीज केली होती का? अपघातानंतर सत्ताधारी पक्षाचा एक आमदार पोलिस स्टेशनमध्ये होता अशी माहिती समोर आळी आहे. त्या आमदाराची या प्रकरणात नेमकी भूमिका काय?, असा सवाल पटोलेंनी केला.

कार चालकाच्या वडिलांचे कुख्यात माफियांशीही संबंध असल्याचे समजते, असं पटोलेंनी लिहिलं.

फडणवीसांनी याच प्रकरणात एवढी तत्परता का दाखवली?
पुढं त्यांनी लिहिलं की, राज्याचे गृहमंत्री अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्त कार्यालयाला भेट देतात आणि पत्रकारांना खुलासे करतात. एवढी तत्परता त्यांनी दाखवण्याचे कारण काय? ज्या बेकायदेशीर घटनांमध्ये भाजपचा काही संबंध असतो वा इतर संबंध असतात,त्यात ठिकाणीच फडणवीस तातडीने जातात, हे संशयास्पद आहे. परवा भाजपच्या उमेदवाराने पैसे वाटल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर तेथेही हे गृहस्थ गेले होते, एरवी ते कोणतेच प्रकरण गांभीर्याने घेत नाहीत. मग याच प्रकणात एवढी तत्परता का? या प्रकरणात पुण्याचे पालकमंत्री मात्र कुठेच दिसत नाही, हेही आश्चर्चाचे आहे, असं पटोले म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज