सुगाव घटनेतील मृत जवानांच्या कुटुंबियांना शासनाकडून दहा लाखांची मदत जाहीर; मंत्री विखेंची माहिती
अहमदनगर – अकोले तालुक्यातील सुगाव घटनेत मृत झालेल्या एस.डी.आर.एफ जवानांच्या (SDRF jawan) कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहीती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली.
कल्याणमध्ये ठाकरे पालटणार बाजी की शिंदे राखणार गड, बालेकिल्यात कोणाला मिळणार विजय?
प्रवरा नदीपात्रात (Pravara River) मृत झालेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्यासाठी स्थानिक प्रशासनाने एसडीआरएफच्या पथकाला पाचारण केले होते. सुगाव येथे पथक दाखल झाल्यानंतर त्यांनी शोधकार्य सुरू केले. मात्र, पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने या पथकातील पीएसआय प्रकाश नाना शिंदे, कॉन्स्टेबल राहुल गोपीचंद पावरा, वैभव सुनील वाघ यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेन प्रशासन हादरले, ग्रामस्थांच्या मदतीने या तीन जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यापैकी पंकज पंढरीनाथ पवार, अशोक हिम्मतराव पवार यांना पुढील उपचाराकरिता स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इलेक्टोरल बाँड्समुळे चर्चेत आल्याला मेघा इंजिनीअरिंगला महाराष्ट्रात अनेक मोठी कंत्राट…
या घटनेचे वृत्त समजल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना महसूल व पोलीस प्रशासनाला दिल्या. दुपारी स्वत: पालकमंत्री विखे पाटील, आमदार वैभव पिचड, राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला, विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह महसूल व प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
यासर्व मृत जवानांच्या पार्थिवावर मंत्री विखे पाटील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली अर्पण केली. पोलीस पथकाने शोकधून आणि बंदूकीची सलामी देवून मृतदेह त्यांच्या गावी रवाना करण्यात आले. याप्रसंगी जवानाचे नातेवाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भावना आवरणे अवघड झाले होते. यासर्वांना मंत्री विखे पाटील यांनी दिलासा दिला.
या सर्व जवानांच्या कुटूंबियांना दहा लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी असून सर्व मृतदेह नातेवाईकांकडे रवाना करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
पाण्यामध्ये बुडालेल्या अन्य दोन व्यक्तिंचा तपास करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत असून, धरणातून पाण्याचा प्रवाहही आता बंद करण्यात आला आहे. ही घटना घडल्यानंतर पाण्याचा प्रवाह कमी करण्याच्या सूचना आपण यापूर्वीच दिल्या होत्या. परंतू, आंदोलकांच्या भावना लक्षात घेवून संपूर्ण प्रवाहच बंद करण्याच्या सुचना आपम जलसंपदा विभागाला दिल्याचं त्यांनी सांगितलं.