इलेक्टोरल बाँड्समुळे चर्चेत आल्याला मेघा इंजिनीअरिंगला महाराष्ट्रात अनेक मोठी कंत्राट…

इलेक्टोरल बाँड्समुळे चर्चेत आल्याला मेघा इंजिनीअरिंगला महाराष्ट्रात अनेक मोठी कंत्राट…

Pune Ring Road contract : इलेक्टोरल बाँड् (Electoral Bonds) खरेदीदारांच्या यादीत नाव असलेल्या हैद्राबादस्थित कंपनी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला (Megha Engineering & Infrastructure Limited) गेल्या दोन वर्षांत मुंबई महापालिकेकडून दोन मोठी कंत्राटे मिळाली होती. त्यानंतर आता याच कंपनीला आणखी चार मोठी कंत्राटं मिळाली आहेत. पुणे वर्तुळाकार रस्त्यातील (Pune Circular Road) एकूण तीन टप्प्यांच्या कामाचे तसेच बहुउद्देशीय मार्गिकेतील एका टप्प्याच्या कामाचे कंत्राट या कंपनीला मिळाले.

पुणे कार अपघात प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कडक शिक्षा द्या; पटोलेंची मागणी 

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) पुणे वर्तुळाकार रस्ता आणि विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या कामासाठी आर्थिक निविदा मंगळवारी खुल्या कऱण्यात आल्या होत्या. त्यात मेघा इंजिनिअरिंग कंपनीने ही चार कंत्राटे मिळवली आहेत. पलवकरच आता निविदा अंतिम होऊन त्या कंपनीला चार कंत्राटे दिली जाणार आहेत.

एमएसआरडीसीच्या पुणे वर्तुळाकार रस्त्याच्या पाच टप्प्यांच्या कामासाठी मेघा इंजिनिअरिंगने पाच निविदा सादर केल्या होत्या, तर विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेतील तीन टप्प्यांच्या कामासाठी तीन निविदा सादर केल्या होत्या. पुणे वर्तुळाकार रस्त्यांच्या तीन टप्प्यांतील कामासाठीची निविदा मिळाली आहे. या प्रकल्पातील टप्पा एक, टप्पा पाच आणि टप्पा सातच्या बांधकामाचे कंत्राट मेघा इंजिनीअरिंगला मिळाल्याची माहीती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. पुणे वर्तुळाकार रस्त्यातील उर्वरित दोन टप्प्यांच्या कामाच्या निविदेत इतर कंपन्यांनी बाजी मारली आहे.

Tamanna Bhatia चा ‘अरनमनाई 4’ ने जगभरात जमवला 100 कोटींचा गल्ला 

विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेतील तीन टप्प्यांच्या कामासाठी तीन टेंडर्स सादर केलेल्या मेघा इंजिनिअरिंगला केवळ एका टप्प्याच्या कामात यश आले आहे. या प्रकल्पाच्या नवव्या टप्प्याचे कंत्राट मेघा इंजिनीअरिंगला देण्यात येणार आहे.

आजवर कोणती कंत्राट मिळवली?
मेघा इंजिनिअरिंग कंपनीला मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे कंत्राट देण्यात आले होते. तर मुंबई महापालिकेनेही या कंपनीला काही रस्त्यांच्या कामाचे कंत्राटही दिले आहे;. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याचे कंत्राटही देण्यात आले आहे. त्यात आता पुणे वर्तुळाकार रस्त्यातील तीन टप्प्यांच्या कामाचीही भर पडली आहे.

बाँड खरेदीमध्ये दुसरा क्रमांक
मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी इलेक्टोरल बाँड खरेदी प्रकरणामुळे चर्चेत आली. या कंपनीने 966 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड्स खरेदी केले आहेत आणि ही कंपनी इलेक्टोरल बाँड्स खरेदी करण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube