अजितदादांचं माहिती नाही पण, भुजबळ नाराज असल्याचं ऐकलं; जयंत पाटलांना कशाचा सुगावा?

अजितदादांचं माहिती नाही पण, भुजबळ नाराज असल्याचं ऐकलं; जयंत पाटलांना कशाचा सुगावा?

Jayant Patil on Chhagan Bhujbal : निवडणुकीचा कल कोणत्या बाजूने लागणार याचा अंदाज छगन भुजबळांना नेहमीच असतो. भुजबळ नाराज आहेत हे आम्हीही ऐकून आहोत अजित पवार नाराज आहेत की नाही माहिती नाही. याबाबतीत माझा कुणाशीच संपर्क नाही. भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातले दोन पक्ष फोडून सुद्धा जनाधार मिळत नाही. म्हणून आणखी एका पक्षाला सोबत घेतलं. पण, जेवढे पक्ष एकत्रित करण्याचा प्रयत्न केला जातोय ते सगळे पक्ष जनाधार कमी करणारे पक्ष आहेत. ज्यावेळी ४ जूनला निकाल येतील त्यावेळी महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे हे त्यांच्याही लक्षात येईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

जयंत पाटील पुढे म्हणाले,  जनतेचा कौल कोणत्या बाजूला जाणार आहे याचा अंदाज छगन भुजबळांना नेहमीच येतो. त्यामुळे त्यांनी हे सुतोवाचा केल्याचं दिसत आहे. बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड उद्धव ठाकरेच आहेत. त्यामुळे राज ठाकरे महायुती सोबत गेल्याने काही फरक पडेल असं मला वाटत नाही. राज ठाकरेंचा नेहमीच वापर केला जातो त्यामुळे त्यावर अधिक काही न बोललेलंच बरं.

13-14 जागा मिळवतानाच माझ्या नाकीनऊ, मी कशाला..; सांगलीच्या जागेवरून होणाऱ्या आरोपांवर जयंत पाटील काय म्हणाले?

कांद्याचा प्रश्न राज्यातील तीन चार जिल्ह्यांत फार महत्वाचा आहे. किरण सानपने त्या ठिकाणी जाऊन हा प्रश्न मांडण्याचं काम केलं. त्यावर उत्तर काय तर जय श्रीराम. त्यामुळे महाराष्ट्राला कळलं की शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाहण्याची ह्यांची (भाजप) प्रवृत्ती काय आहे. त्यांना कशाचंच उत्तर देता आलं नाही तर जय श्रीराम शिवाय दुसरं काहीच सुचत नाही.

छगन भुजबळ नाराज आहेत हे आम्हीही ऐकून आहोत. बाकी कोण नाराज आहेत याची मला माहिती नाही. बारामतीच्या निवडणुकीनंतर अजित पवार फारसे दिसत नाहीत, या प्रश्नावर उत्तर देताना पाटील म्हणाले, राजकीय नेते अज्ञातवासात गेले तर त्याची इतकी चर्चा करण्याची गरज नसते. त्यांनाही प्रायव्हसीची गरज असते. इतके दिवस प्रचार केल्यानंतर आता दिसत नाहीत म्हणून त्यावर इतकं आकांडतांडव करण्याची गरज नाही असं मला वाटतं. चार जूनच्या निकालानंतर महायुतीत पळापळी सुरू होईल. त्याची परिणती सरकार पडण्यात होणार की आणखी कशात होणार हा नंतरचा प्रश्न आहे. पण या निकालानंतर जनता पुढील विचार करून निर्णय घेईल असे वाटत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील शेवटचा डाव आखणार.. दिल्लीसुद्धा पवारांना घाबरते म्हणणाऱ्यांना विखेंचा मार्मिक टोला

follow us
  • fb
  • instagram
  • youtube