‘जिरेटोप घालणाऱ्याला अन् देणाऱ्यालाही डोकं नाही’; उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला!

‘जिरेटोप घालणाऱ्याला अन् देणाऱ्यालाही डोकं नाही’; उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला!

Udhav Thackeray On Prafulla Patel : जिरेटोप घालणाऱ्याला अन् देणाऱ्यालाही डोकं नाही, असा सणसणीत टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांना लगावलायं. दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप घातला होता. त्यावरुन चौफेर टीका झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही टोलेबाजी केलीयं.

हंसल मेहता उघडणार नव्या घोटाळ्याची फाईल, ‘स्कॅम २०१०: द सुब्रत रॉय सागा’ वेब सीरिजची केली घोषणा

उद्धव ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवरायांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बरोबरी केलीयं. पटेल तुम्हाला तुमच्या घरात कोणाची पूजा करायचीयं त्याची करा पण आम्ही आमचे दैवत छत्रपती शिवरायांचा अपमान कदापिही सहन करणार नाही. प्रफुल्ल पटेल यांनी महाराजांचं जिरेटोप पंतप्रधान मोदींच्या डोक्यावर ठेवलं आहे, देणाऱ्यालाही डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही, अशी टोलेबाजी उद्धव ठाकरेंनी केलीयं.

दुसरीकडे मिंधे गट दाढी खाजवत पाठीमागे चालत आहेत, ते काय बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार आहेत, त्यांच्यासमोर महाराष्ट्र लुटला जात अन् मिंधे गट दिल्लीची चाकरी करीत आहेत. छत्रपती शिवरायांची सुरत लुटली होती, त्याचं सुरतेचे दोन जण तुमच्या डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटत आहेत, तरीसुद्धा तुम्ही शेपूट घालून चाकरी करीत आहेत, हेच बाळासाहेबांचे विचार का? हेच हिंदुत्व का? अशी टोलेबाजी उद्धव ठाकरे यांनी केलीयं.

योगींना हटवणार! केजरीवालांच्या दाव्यावर भाजपने सुनावलं, तिहारला जायची तयारी..,

येत्या 4 जूननंतर देशात आणि राज्यात इंडिया आघाडीचंच सरकार येणार आहे. इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही महाराष्ट्राची लुट थांबवणार आहोत. लुट करुन जे वैभव गुजरातला नेलं आहे ते वैभव मी महाराष्ट्रात पर आणल्याशिवाय राहणार नसल्याचंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

वादंगावर काय म्हणाले पटेल?
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ, अशी प्रतिक्रया प्रफुल्ल पटेल यांनी जिरेटोप वादावर आपल्या एक्स हँडलवर दिलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज