सहाशेहून अधिक वकिलांचा लेटर बॉम्ब; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आता थेट काँग्रेसवर हल्ला !

  • Written By: Published:
सहाशेहून अधिक वकिलांचा लेटर बॉम्ब; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आता थेट काँग्रेसवर हल्ला !

After 600 Lawyers Write To Chief Justice: ज्येष्ठ कायदेतज्ञ्ज हरिष साळवे (Harish Salve) यांच्यासह देशभरातील नामांकित सहाशेहून अधिक वकिलांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjaya Chandrachud) यांना एक पत्र लिहिले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले व राजकारणी अडकलेल्या प्रकरणात एक विशेष गट न्यायालयाच्या निर्णयावर दबाव टाकत असल्याचा आरोप वकिलांनी केलाय. त्यावरून आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ट्वीटमधून काँग्रेसवरच निशाणा साधलाय. तर भाजपचे इतर नेतेही काँग्रेसवर बरसले आहेत.


‘गोविंदा तुमच्यापेक्षा चांगला नट, टीका करणाऱ्यांना सद्बुद्धी…; CM शिंदेंचा जयंत पाटलांना खोचक टोला

दुसऱ्यांना धमकावणे ही काँग्रेसची जुनी संस्कृती आहे. गेल्या पाच दशकापासून काँग्रेस हेच करत आलीय. काँग्रेसने निर्लज्जपणे आपले स्वार्थ जगासमोर ठेवले आहेत. हा पक्ष कोणत्याही प्रकारची देशाशी बांधिलकी ठेवू इच्छित नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय. ते निर्लज्जपणे स्वतःच्या हितासाठी इतरांकडून वचनबद्धता शोधत आहे. आता तर काँग्रेस देशाविषयी कुठलीही बांधिलकी टाळत आहे. देशातील 140 कोटी जनता यांना नाकारत आहे. त्यात काही आश्चर्य नाही, असा टोलाही पंतप्रधानांनी लगावलाय.



नवीन आलेल्या पक्षांना जागा पण जुन्या पक्षांना…; आता रामदास आठवलेही भाजपवर नाराज

विवेकी आवाज आता उघडणपणे बाहेर येतोय-रिजाजू
तर केंद्रीय मंत्री आणि अरुणाचल प्रदेशमधून लोकसभेचे उमेदवार असलेले किरेन रिजाजू यांनीही काँग्रेसला फटकारले आहे. वकिलांनी पत्र लिहिल्यामुळे विवेकी आवाज आता उघडपणे बाहेर येत आहे. काँग्रेसच्या लोकांनी वचनबध्द न्यायव्यवस्थेची संकल्पना मांडली. पण राज्यघटना निलंबित केली आहे. काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीसाठी न्यायालये आणि घटनात्मक अधिकाऱ्यांनी त्यांची सेवा करावी, असे त्यांना वाटते. नाही तर त्यांच्यावर हल्ले सुरू केले जातात, असा आरोप रिजिजू यांनी केली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी ऑल मणिपूर बार असोसिएशननेही यासारखेच एक पत्र सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना लिहिले होते.

वकिलांनी पत्रात नक्की काय म्हटलेय?

खास समूहाकडून वेगवेगळ्या प्रकारे दबाव टाकला जातेय. यामुळे न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलील होत आहे. हे खास समूह अशी विधाने करतात जी योग्य नाहीत आणि राजकीय स्वरुपात त्याचा फायदा घेण्यासाठी सर्वकाही केले जाते, असा आरोप पत्रात केला आहे. त्याचे कारणेही पत्रात दिली आहेत. एक विशेष समूह हा न्यायालयाच्या निकालांवर प्रभावीत करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी दबाव टाकला जातो. एखाद्या खटल्यामध्ये राजकीय नेता अडकलेला असतो किंवा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप असतात ते असे करतात. त्यांच्याकडून काही आरोप केले जातात. त्यातून देशातील लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल, असा त्यांचा प्रयत्न असतो.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज