‘गोविंदा तुमच्यापेक्षा चांगला नट, टीका करणाऱ्यांना सद्बुद्धी…; CM शिंदेंचा जयंत पाटलांना खोचक टोला

‘गोविंदा तुमच्यापेक्षा चांगला नट, टीका करणाऱ्यांना सद्बुद्धी…; CM शिंदेंचा जयंत पाटलांना खोचक टोला

Eknath Shinde on Jayant Patil : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आहुजा (Govinda Ahuja) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Chief Minister Eknath Shinde) शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून गोविंदा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर आज या चर्चा खऱ्या ठरल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गोविंदाच्या पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. शिवसेनेच्या बाळासाहेब भवन कार्यालयात हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, गोविंदाच्या पक्षप्रवेशावरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी टीका केली होती. यावर आता सीएम शिंदे यांनी उत्तर दिले आहे.

Loksabha Election: गोविंदाची पुन्हा राजकारणात एन्ट्री! शिवसेनेत पक्षप्रवेश, उत्तर-पश्चिम मुंबईतून रिंगणात उतरणार? 

गोविंदाचे पिक्चर आता चालत नाहीत, एखादा चालणारा नट तरी शिंदेंनी घ्यायचा होता, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला होता. त्यावर बोलतांना मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्री म्हणाले, गोविंदा तुमच्यापेक्षा चांगला नट आहे ना, मग अजून काय हवे आहे… कलाकारांचा अपमान करू नये, दिवस कधी फिरतील हे सांगता येत नाही. एका कलावंताचं अपमान करणं म्हणजे, संपूर्ण इंडस्ट्रीचा अपमान करण्यासारखं आहे. जो कलाकारांचा अपमान करेल देव त्यांना बुध्दी देवा, असा खोचक टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

Letsupp Special शिवतारेंनी स्वतःच आग लावली…. मग ती विझली कशी? जाणून घ्या इनसाईड स्टोरी! 

गोविंदाच्या नावासाठी मुंबईतल्या कुठल्या मतदासंघाचा विचार होऊ शकतो, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले की, गोविंदा निवडणूक आणण्याचं काम करतील. गोविंदा आपल्यासोबत कोणत्याही अटीशिवाय आले. गोविंदा हा चित्रपट उद्योग आणि सरकार यांच्यातील दुवा आहे. गोविंदा आता शिवसेनेचा स्टार प्रचारक असेल. आमच्या सरकारच्या कामाने प्रभावित होऊन गोविंदाने शिवसेनेत प्रवेश केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

14 वर्षांच्या राजकीय वनवासानंतर…
यावेळी बोलतांना गोविंदा म्हणाले,जय महाराष्ट्र! मी आज एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. मी सर्वांना शुभेच्छा देतो. मी आज या पक्षात प्रवेश करत आहे. मी राजकारण सोडल्यानंतर पुन्हा राजकारणात येईन असे कधीच वाटले नव्हते. मात्र 14 वर्षांच्या राजकीय वनवासानंतर एकनाथ शिंदे यांच्या कृपेने मी पुन्हा त्यांच्या पक्षात आलो आहे. मी सर्वांचे आभार मानतो. तुमच्याकडून मिळालेली जबाबदारी मी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडेन. मी कला आणि संस्कृतीसाठी काम करेन, असं गोविंदा म्हणाला.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube