हंसल मेहता उघडणार नव्या घोटाळ्याची फाईल, ‘स्कॅम २०१०: द सुब्रत रॉय सागा’ वेब सीरिजची केली घोषणा
Scam 2010: The Subrata Roy Saga : स्कॅम 1992: हर्षद मेहता स्टोरी’, ‘स्कॅम 2003: द तेलगी स्टोरी’ (Scam 2003: The Telgi Story) या दोन वेब सीरिजनंतर आता हंसल मेहता यांची तिसरी वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘स्कॅम 2010: सुब्रत रॉय सागा’ असं या तिसऱ्या वेब सीरीजनचे नाव आहे. ही नवीन स्कॅम सीरिज OTT प्लॅटफॉर्म Sony Liv वर रिलीज होणार आहे. नुकतीच दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी या वेब सीरिजची घोषणा केली आहे.
तमन्नाचा ‘अरमानाई 4’ हिंदीतही; 24 मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला
हंसल मेहता यांनी यापूर्वी ‘स्कॅम 1992’ या वेबसिरीजमध्ये हर्षद मेहताचा स्टॉक मार्केट घोटाळा आणि ‘स्कॅम 2003′ या वेब सीरिजमध्ये अब्दुल तेलगीचा स्टॅम्प पेपर घोटाळा दाखवला होता. या घोटाळ्यांची सुरूवात, त्याची व्याप्ती, घोटाळ्यांमुळे होणारे राजकीय उमटलेले राजकीय पडसाद यावर प्रकाश टाकण्यात आला होता. आता हंसल मेहता सुब्रत रॉय यांच्या घोटाळ्याची कहाणी सांगणार आहेत. स्कॅम 2010: सुब्रत रॉय सागा’ या वेब सीरिजमध्ये 2010 मध्ये उघडकीस आलेला 25 हजार कोटींचा घोटाळा दाखवल्या जाणार आहे. या वेब सिरीजमध्ये हंसल मेहता सहाराच्या सुब्रत रॉय यांच्या घोटाळ्यावर भाष्य करणार आहेत. काहीच महिन्यांपूर्वी सुब्रत रॉय यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.
‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेला वळण; सावीने रचला ‘तो’ मास्टर प्लॅन
हंसल मेहता यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे स्कॅमच्या पुढील सीरिजची घोषणा केली. हंसल मेहता यांनी या वेब सिरीजचे पोस्टर लाँच केले. ही वेब सिरीज लवकरच OTT प्लॅटफॉर्म Sony Liv वर रिलीज होणार आहे.
काय आहे सुब्रत रॉय यांचा घोटाळा?
हंसल मेहता यांची आगामी वेब सिरीज स्कॅम 2010 ही तमल बंदोपाध्याय यांच्या ‘सहारा: द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकावर आधारित आहे. सुब्रत रॉय हे सहारा ग्रुप ऑफ बिझनेसचे संस्थापक होते. हे पुस्तक सुब्रत रॉय यांच्यावरील चिट-फंड हेराफेरीपासून ते बनावट गुंतवणूकदारांपर्यंतच्या आरोपांशी संबंधित आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सुब्रत रॉय यांना अटक करण्यात आली होती. रॉय दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात राहिले. नंतर 2016 मध्ये त्याची पॅरोलवर सुटका झाली. त्यानंतर, सेबीने त्याचा पॅरोल रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्यांना पुन्हा तुरुंगात टाकण्यात आले. सुब्रत रॉय यांच्यावर २५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे.
दरम्यान, ‘स्कॅम २०१०: द सुब्रत रॉय सागा’ ही वेब सीरिज अप्लॉज़ एंटरटेनमेंट प्रोड्यूस करत असून हंसल मेहता दिग्दर्शित करणार आहे. या सीरिजमध्ये कोणते कलाकार दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.