ताथवडेमध्ये भाजप पॅनलचा जोरदार प्रचार; राहुल कलाटे यांचं भविष्यासाठी ठोस व्हिजन

ताथवडे गावातील प्रतिष्ठित आणि शिवसेना चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष संतोष पवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

News Photo   2026 01 07T203411.968

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर (Election) प्रभाग क्रमांक २५ मधील भारतीय जनता पक्षाच्या पॅनलच्या प्रचाराच्या पुढच्या टप्प्यात ताथवडे गावठाण येथील नृसिंह मंदिर परिसरात नारळ फोडून पदयात्रा करण्यात आली. प्रचार पदयात्रा नृसिंह मंदिर, ताथवडे गावठाण येथून सुरू होऊन रघुनंदन कार्यालय, खांबेटे वस्ती, लोंढे वस्ती या मार्गे संपन्न झाली.

यावेळी पुढील काळातील व्हिजन मांडताना राहुल कलाटे यांनी सांगितले की, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नियोजित डीपी रस्ते, पर्यायी मार्ग व पार्किंग व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी, दररोज पाणीपुरवठ्याचे उद्दिष्ट, तसेच ऑडिटोरियम, नवीन उद्याने, क्रीडा स्टेडियम्स आणि सांस्कृतिक व सामाजिक सुविधा उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पर्यावरणपूरक व नियोजनबद्ध विकास हाच पुढील कार्यकाळाचा केंद्रबिंदू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

माजी खासदार नाना नवलेंचा फोन

माजी खासदार नाना नवले म्हणजेच विदुरा यांच्याबद्दल सांगताना राहुल कलाटे भावूक झाले. नानांचे आणि आमचे मागच्या पिढ्यांपासूनचे हृदय संबंध राहिले आहेत. आजही त्यांचा फोन आला आणि त्यांनी मागील आठवणींना उजाळा देत “राहुल मी कायम तुझ्यासोबत आहे!” असे म्हणत आशीर्वाद दिले. जेष्ठांचे हे शब्द आणि नागरिकांची साथ मला संघर्ष करण्याचे बळ देतात, असे कलाटे म्हणाले.

ताथवड्यात पवारांचा भाजप प्रवेश

ताथवडे गावातील प्रतिष्ठित आणि शिवसेना चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष संतोष पवार यांनी कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह शरद पवार, नागेश पवार, जयदीप पवार यांनीही भाजपमध्ये प्रवेश करत प्रभाग २५ मधील भाजपच्या पॅनलचा प्रचार सुरु केला. संतोष पवार यांनी २०१७ च्या मनपा निवडणुकीत ताथवडे गावातून दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. त्यामुळे भाजपला स्थानिक पातळीवर पवारांची साथ मिळाल्याचे चित्र बघायला मिळते आहे.

ताथवडे परिसरात काम करतांना रस्त्यांच्या विकासाला गती आणि स्वच्छ व मुबलक पाणी या सुविधांना प्राधान्यक्रमाने सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यातून गाडा रस्ता, जीवन नगर ते एमटीयूकडे रस्ता, शनी मंदिरापासून मारुंजीकडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले तर अंडरपास मार्गे ताथवडे गावठाण ते पुनावळेपर्यंतच्या डीपी रस्त्याचे काम प्रगती पथावर आहे. तसेच आपल्या ताथवडे परिसरात २५ लाख लिटर साठवण क्षमतेची पाण्याची टाकी आणि १० लाख लिटरचा संप बसवण्यात आला असून, वापराचे पुरेसे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अंडर पास, सर्व्हिस रोडसाठी नागरिकांच्या बरोबरीने आंदोलनाची भूमिका घेऊन, कामे मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. आपला भाग विकसित होतो आहे. ताथवडेचा सुनियोजित विकासाची करतांना विकासाला गती देण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन येत्या काळात नक्की सोबत असेल असं राहुल कलाटे म्हणाले.

ताथवडे, वाकड आणि पुनावळे गावांचा सर्वांगीण विकास करण्याचा हेतू आहे. इथल्या ट्राफिक आणि इतर समस्यांना सोडविण्यासाठी मुख्य रस्त्यानं उपरस्ते, एलिव्हेटेड रोड यासारख्या उपाययोजनांवर भर दिला जाईल. भाजपला प्रचारात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. महिलांमध्ये लाडकी बहीण योजनेला घेऊन सकारत्मकता आहे असं श्रुती राम वाकडकर म्हणाल्या.

यावेळी प्रभाग क्रमांक २५ मधील भाजपचे अधिकृत उमेदवार राहुल तानाजी कलाटे, श्रुती राम वाकडकर, रेश्मा चेतन भुजबळ आणि कुणाल वाव्हळकर यांच्यासह राम वाकडकर, चेतन भुजबळ, संतोष पवार, बाळासाहेब सपकाळ, सुरेश पवार, अशोक पवार, सीताराम पवार, पाटीलबुवा पवार, अनिकेत नवले, भारती विनोदे, जयदीप पवार, नागेश पवार, लक्ष्मणराव मोहिते, मयूर पवार, संजय पवार, संतोष कदम, वसंतराव नवले, चंद्रकांत वाडकर, गणेश सपकाळ, जीवन नवले, निखिल नवले, जालिंदर फेंगसे, बाळासाहेब शिंदे (गुरव), पांडुरंग शिंदे, विजय वाघुळे, संदीप पारखी गिरीश दर्शले, देविदास पवार, राजेंद्र पवार, मारुती पवार, सोनवणे, जाधव, निकाळजे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

follow us