‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेला वळण; सावीने रचला ‘तो’ मास्टर प्लॅन 

‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेला वळण; सावीने रचला ‘तो’ मास्टर प्लॅन 

Piriticha Vanava Uri Petla : संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी कलर्स मराठीवरील ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ (Piriticha Vanava Uri Petla) मालिकेतील सगळे कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.  प्रेक्षकांकडून या मालिकेतील सगळ्या कलाकारांना भरभरून प्रेम मिळत आहे.

आतापर्यंत या मालिकेत अर्जुन आणि सावीवर अनेक संकटे आल्याचे आपण पहिले आहे मात्र या सर्व संकटांवर अर्जुन आणि सावीने मात केली आहे. या मालिकेत आतापर्यंत अर्जुनची प्रत्येक संकटात सावीने साथ दिली आहे. मात्र आता या मालिकेत उत्कंठावर्धक वळण आले आहे.

या मालिकेत आता विद्याधर दादाचं सत्य समजल्यामुळे त्याची हत्या करण्यात आली होती हे खऱ्या अर्जुनला समजले आहे मात्र सावीला अजूनही खोट्या अर्जूनवर संशय आलेला नाही. तर आता या लोकप्रिय मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.

या मालीकेत प्रेक्षकांना आतापर्यंत असं दिसत होते की, खोट्या अर्जुनने भीमासदनात प्रवेश केला आणि त्याला घरी  आणण्यात विश्वंभर मामाचा हात आहे मात्र प्रदर्शित करण्यात आलेल्या नवीन प्रोमोमध्ये असे दिसते की, सावीनेच पैसे देऊन या खोट्या अर्जुनला घरात आणले म्हणजेच आता  शत्रूंना त्यांच्याच खेळात मात देणार सावी.

T20 World Cup 2024 मध्ये टीम इंडियासाठी धोका ठरणार ‘हे’ तीन भारतीय खेळाडू

नवीन प्रोमोनुसार सावीच या सगळ्या प्लॅनची मास्टरमाईंड आहे. मात्र सावीला हा फेक अर्जुन कुठे आणि कसा भेटला ? या खोट्या अर्जुनला घरात आणण्या मागचा त्याचा प्लॅन काय आहे? या प्रश्नांची उत्तरे आता येणाऱ्या एपिसोडमध्ये  प्रेक्षकांना भेटणार आहे. यामुळे पाहत राहा दररोज, रात्री 10 वाजता कलर्स मराठीवर आणि  कधीही JioCinema वर ‘प्रितीचा वनवा उरी पेटला’

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज