निया शर्माचा खतरनाक लूक पाहून चाहत्यांना बसला धक्का; ‘सुहागन चुडैल’चा भयानक प्रोमो रिलीज

निया शर्माचा खतरनाक लूक पाहून चाहत्यांना बसला धक्का; ‘सुहागन चुडैल’चा भयानक प्रोमो रिलीज

Nia Sharma: निया शर्मा (Nia Sharma) तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. यावेळी निया ‘सुहागन चुडैल’सोबत (Suhaagan Chudail) परतली आहे. (Social media) या शोमध्ये अभिनेत्रीचा राक्षसी अवतार पाहायला मिळत आहे. निया याआधी सुपरनॅचरल टीव्ही शो ‘नागिन 4’ मध्ये (Naagin 4) दिसली होती. ‘सुहागन चुडैल’मध्ये निया एका डायनच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)


‘सुहागन चुडैल’चा प्रोमो रिलीज

‘सुहागन चुडैल’ या शोबद्दल बरेच काही बोलले जात होते आणि आता अखेर शोचा धमाकेदार प्रोमो समोर आला आहे. निया शर्मा अतिशय खतरनाक अवतारात दिसणार आहे. प्रोमो समोर आला असून निया शर्मा लाल रंगाच्या पोशाखात दिसत आहे. प्रोमोमध्ये असे दिसून येते की डायनचे पाय खूपच भयानक दिसत आहेत. निया उर्फ ​​’सुहागन चुडैल’ तिच्या पहिल्या प्रोमोमध्ये इशारा दिला आहे. ‘ज्याने सगळ्यांना आपल्या प्रेमाची काळजी घ्यायला सांगितली आहे कारण ती त्यांचे प्रेम चोरण्यासाठी इथे आली आहे.’

नियाचा राक्षसी अवतार

निया शर्मासोबत ‘सुहागन चुडैल’मध्ये झैन इबाद खानही मुख्य भूमिकेत आहे. या शोमध्ये अभिनेत्री देबचंद्रिमा सिंघा रॉय देखील दिसणार आहे. शोची कथा 200 वर्षांची असलेल्या एका डायनची आहे आणि ती अंतिम शक्ती प्राप्त करण्याच्या मोहिमेवर आहे. चुडैल अंतिम शक्ती मिळविण्यासाठी 16 शृंगार शक्ती मिळवत आहे आणि 16 वी शक्ती सिंदूर आहे आणि ती मिळवण्यासाठी तिला तिच्या आयुष्यातील 16 व्या पुरुषाला संपवावे लागणार आहे.

निलेश साबळेच्या नव्या कोऱ्या शोमध्ये Jun Furniture च्या टीमची हजेरी; शोचा प्रोमो रिलीज

‘हा’ अभिनेता झळकणार नकारात्मक भूमिकेत

याआधी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ स्टार शहजादा धामीला या शोमध्ये मुख्य भूमिकेसाठी अप्रोच करण्यात आल्याचे बोलले जात होते, मात्र तसे नाही. निया आणि झैनसोबत ‘नागिन 5’ स्टार दिनेश मेहता सुहागन चुडैलमध्ये नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याचेही बोलले जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube