निलेश साबळेच्या नव्या कोऱ्या शोमध्ये Jun Furniture च्या टीमची हजेरी; शोचा प्रोमो रिलीज

निलेश साबळेच्या नव्या कोऱ्या शोमध्ये Jun Furniture च्या टीमची हजेरी; शोचा प्रोमो रिलीज

Jun Furniture films team reach at Nilesh Sabale Show : अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे ( Nilesh Sabale ) त्याचा नवीन शो ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ कलर्स मराठीवर आपल्या रसिकांसाठी घेऊन आला आहे. नुकताच या शोचा दुसरा प्रोमो रिलीझ झाला असून यामध्ये महेश मांजरेकरांसह जुनं फर्निचर ( Jun Furniture ) चित्रपटाची संपूर्ण टीम एन्जॅाय करताना दिसत आहे.

… म्हणून रिंकू सिंग आणि केएल राहुलची संघाच्या बाहेर, आगरकरने सांगितले खरं कारण

इतकंच नाही तर, चित्रपटाच्या संपूर्ण टीमने चांगलीच धमाल, मजामस्ती केल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे. निलेश साबळेंचे प्रश्न आणि रोहितच्या उत्तरांवर उपेंद्र लिमेय अन् सचिन खेडेकर लोटपोट हसत आहेत. त्यामुळे एकंदरीत या मंचावरती संपूर्ण टीम धमाल करणार असल्याचे दिसून येतेय.

मुख्यमंत्र्यांच्या मुलाची संपत्ती घटली, किती आहे श्रीकांत शिंदे यांचं उत्पन्न? वाचा सविस्तर

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’च्या या नवीन प्रोमोला चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला. रसिकवर्ग आता पुढच्या एपिसोडची आतुरतेने वाट पाहात आहेत. निलेश साबळेंचा नवीन शो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरलेला दिसत आहे.

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या शोचे लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन डॉ. निलेश साबळे करत आहेत. तर भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम व रोहित चव्हाण आदी कलाकारांचा समावेश आहे. कलर्स मराठीवर शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम पाहायला मिळणार.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube