इंडियन आयडलचा नवा सीझन आणखी खास! जाणून घ्या शोच्या पाच खास गोष्टी

Indian Idol हा शो आणखी खास असणार आहे. कारण हा सीजन इंडियन आयडल : यादों की प्लेलिस्ट या शीर्षकाखाली असणार आहे.

Letsupp (5)

New season of Indian Idol is more special! Know five special things about the show : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा प्रमुख संगीत रियालिटी शो इंडियन आयडलचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी हा शो आणखी खास असणार आहे. कारण हा सीजन इंडियन आयडल : यादों की प्लेलिस्ट या शीर्षकाखाली असणार आहे. ज्यामध्ये फक्त गाणेच तर अविस्मरणीय संगीत, भावनात्मक आठवणी आणि 90 च्या दशकातील प्रतिभेचा उत्सव आहे. त्यामुळे तुम्ही हा सीजन अजिबात चूकवू नका. त्यामुळे या सीजनमध्ये कोणत्या खास गोष्टी असणार आहेत. जाणून घेऊ…

इंडियन आयडल ज्युनिअरपासून प्रशंसकांच्या आवडीचे कलाकार परत येणार…

गेल्या सीजनमधील तुमच्या आवडीचे काही स्पर्धक परत येणार आहेत. जे आता मोठे झाले आहेत आणि चमकत आहेत. इंडियन आयडल ज्युनिअरचे प्रसिद्ध चेहरे,संकल्प यदुवंशी आणि सुगंधा दाते, दमदार गायन, प्रचंड अनुभव आणि आपल्या संगीताने भावनिक पूल बांधत पुनरागमन करणार आहे. त्यांचा प्रवास जुन्या आठवणी आणि जिज्ञासेचे सुंदर मिश्रण आहे.

भावनात्मक आणि पूल बांधणारं पुनरागमन…

भावुक होण्यासाठी तयार व्हा. हा सीजन एक व्यासपीठ असण्यापेक्षा लोकांच्या आठवणी आठवणींना उजाळा देणार आहे.संघर्षातून समोर आलेल्या कहाण्या ज्यामध्ये संकल्पची आईप्रती त्याच त्याग बादशहा आणि धर्मेशच्या वडिलांचं अतूट नातं,विशाल दादलांनींच्या काही खास आठवणी या सर्व गोष्टी या व्यासपीठाला आणखी खास बनवणार आहेत.

90 च्या दशकातील प्लेलिस्ट म्युझिकल टाईम मशीन

90 चं दशक पुन्हा एकदा जगायला या व्यासपीठावर मिळेल.यामध्ये 90 च्या दशकातील गाण्यांची प्लेलिस्ट प्रत्येक एपिसोडमध्ये आठवणींच्या जगाची सफर केले जाईल.आजची तरुणाई त्या क्लासिक गाण्यांमध्ये नवा प्राण फुंकेल.

दिग्गज उदित नारायणही होणार सहभागी..

90 च्या दशकाचे संगीताचा उत्सवाचेआयकॉन असणारे उदित नारायण या शोसाठी मेंटॉर आणि होस्ट म्हणून एक आकर्षक स्थान असतील ज्ञान आणि सुरेल आवाज यासह त्या शोला चार चाँद लावतील.

जुन्या आणि नव्या गाण्यांचा संगम

हा सिजन अत्यंत खास असणार आहे.कारण या गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये केवळ गाणेच नाही तर जुन्या आणि नव्या गाण्यांचं संगम होणार आहे.नव्या प्रतिभावंतांसह श्रेया घोषाल,बादशहा,विशाल दादलानी आणि उदित नारायण यासारखे दमदार जज स्पर्धकांसह प्रेक्षकांनाही अनुभवायला मिळणार आहेत.

follow us