तमन्नाचा ‘अरमानाई 4’ हिंदीतही; 24 मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला

तमन्नाचा ‘अरमानाई 4’ हिंदीतही; 24 मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला

Tamannah Bhatia : तमिळ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आता अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या (Tamannah Bhatia) अरमानाई 4 (Aranmanai) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळच घातलायं. आधी हा चित्रपट तमिळ भाषेत प्रदर्शित झाला होता, आता हिंदीतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. येत्या 24 मे पासून अरमानाई 4 हिंदीतून चित्रपटगृहात दाखल होणार आहे. तमिळमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने 70 कोटींचा गल्ला भरला आहे. तर लवकरच हा चित्रपट 100 कोटींचा आकडा गाठणार आहे.

Bhushan Patil: ‘मेहनत आणि जिद्द…’, मराठमोळ्या अभिनेत्याचं हिंदीत पदार्पण, शेअर केली खास पोस्ट

अरमानाई 4 चित्रपटात तमन्ना भाटिया आणि राशीच्या अभिनयाची जादू दिसली आहे. आता हा चित्रपट हिंदीतून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. राशी आणि तमन्नाच्या अभिनयाचे चाहत्यांकडून भलतीच प्रशंसा करण्यात आली आहे. या चित्रपटातील अच्छाचो गाण्यालाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. या चित्रपटात राशी आणि तमन्ना भाटीयासह राचंद्र राजू, संतोष प्रताप, कोवई सरला, योगी बाबू, के.एस. रविकुमार यांचा समावेश आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचं स्थान काय? टीकेवर उत्तर देत पवारांचा खोचक सवाल

दरम्यान, तमन्ना भाटिया या उत्कंठावर्धक चित्रपटासाठी सगळेच उत्सुक असल्याचं कळतंय. तमन्ना आणखी एका उत्कृष्ट प्रोजेक्टची सगळेच वाट बघत आहेत. विविध चित्रपट उद्योगांमध्ये अविस्मरणीय पात्रे सादर करण्याचा तिचा इतिहास पाहता तमन्नाचा अरमानाई 4 मधील सहभाग चित्रपटाला नवीन उंचीवर नेण्यासाठी तयार आहे. शिवाय, जॉन अब्राहम सोबत दिग्दर्शक निखिल अडवाणीच्या “वेदा” मधील तिच्या आगामी भूमिकेसाठी चाहते उत्सुक आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज