Bhushan Patil: ‘मेहनत आणि जिद्द…’, मराठमोळ्या अभिनेत्याचं हिंदीत पदार्पण, शेअर केली खास पोस्ट

Bhushan Patil: ‘मेहनत आणि जिद्द…’, मराठमोळ्या अभिनेत्याचं हिंदीत पदार्पण, शेअर केली खास पोस्ट

Bhushan Patil: ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava) या सिनेमात अभिनेता भूषण पाटीलने (Bhushan Patil) छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आणि तो प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. आता भूषण पाटील एका हिंदी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. (Hindi film) भूषणने आजच त्याचा हिंदी चित्रपटाचं शूटिंग सुरू केल असून त्याने सोशल मीडिया वरून (social media) ही माहिती त्याचा प्रेक्षकांना दिली आहे.

भूषण नव्या प्रोजेक्टबद्दल सांगितलं आहे की, आजवर मराठी सिनेमात अनेक भूमिका साकारल्या आणि त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम देखील दिलं हिंदी चित्रपट विश्वात पदार्पण करण हे माझ्यासाठी देखील आव्हानात्मक आहे. पहिली हिंदी फिल्म आणि त्यात सुद्धा मुख्य भूमिका साकारायला मिळणं हे खूप भाग्याची गोष्ट आहे. हिंदी चित्रपट विश्वात काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे पण तेवढीच धाकधूक सुद्धा आहे, पण प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहणं हा एकच हेतू आहे आणि म्हणून हिंदी प्रेक्षकांना सुद्धा मी आपलंसं करून घेईन ही आशा आहे. आज चित्रपटाच्या शूट चा पहिला दिवस आहे आणि तुमचं प्रेम कायम असच सोबत राहू दे.

आजवर भूषणने अनेक महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत आणि कायम चर्चेत राहिला आहे. अभिनयातून त्याने कायम प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे आणि आता तो हिंदी प्रेक्षकांना भुरळ घालणार आहे. चोख अभिनय कौशल्य असलेला भूषण फिटनेस फ्रिक सुद्धा आहे हे त्याचा सोशल मीडिया वरून कळतच. आता भूषण नक्की कोणता हिंदी चित्रपट करतोय? या चित्रपटाच नाव काय ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळतील. हिंदी मधल भूषण च पदार्पण नक्कीच खास ठरणार आहे यात शंका नाही.

Prerna Arora: …म्हणून अभिनेत्री प्रेरणा अरोरा पहिली भारतीय निर्माती बनली

मराठी प्रेक्षकांना मोहित करणारा अभिनेता म्हणून भूषणची ओळख आहे पण आता तो हिंदीत देखील स्वतःच्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज होत आहे. अद्याप चित्रपटाचं नाव समजलं नसल तरी लवकरच हा हिंदी चित्रपट काय असणार आहे समजणार आहे सोबतीला भूषण या चित्रपटात मुख्यभूमिका साकारणार आहे त्यामुळे सगळ्यांचं प्रेक्षकांना याची उत्सुकता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज